Tuesday, June 23, 2026
Homeभंडाराचक्क बँक मॅनेजरने खातेधारकाच्या लाखो रुपयांचा केला झोल..! - बँक मॅनेजर म्हणतो;...

चक्क बँक मॅनेजरने खातेधारकाच्या लाखो रुपयांचा केला झोल..! – बँक मॅनेजर म्हणतो; ‘मी माझी लाइफ सेट केली,पैसे देणार नाही’…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-रकमेच्या जमापूंजीसाठी तसेच भविष्यातील तजवीज करण्यासाठी एकमेव सुरक्षेची हमी म्हणून सर्वसामान्यांपासून ते धनदांडगे ‘बँक’ चा आधार घेतांना दिसून येतात.त्यामुळे छोट्या व्यवहारांपासून ते मोठे व्यवहार बँकेत खाते उघडून केले जात आहेत.अश्यातच ज्या ठिकाणी सुरक्षेची हमी असते,अश्या ठिकाणीच ग्रहकांसोबत झोल केल्या जात असेल तर विश्वास ठेवावा तरी कुणावर? असा प्रश्न निर्माण झाला आहे.अश्यातच प्रकारे भंडारा शहरात चक्क बँक मॅनेजरने खातेधारकाच्या लाखो रुपयांचा झोल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने अनेकांनी तोंडावर बोट ठेवले आहे.त्यातच झोलाछाप बँक मॅनेजर रक्कम हडप करून ‘मी माझी लाइफ सेट केली,पैसे देणार नाही’..अशी बतावणी करू लागल्याने ‘चोरी त चोरी वरून शिणाजोरी’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.प्रकरणी खातेधारक ग्राहकाने पोलिसांत धाव घेतली आहे.सदरचा प्रकार भंडारा शहराच्या मनप्पुरम गोल्ड लोन बँकेत उघडकीला आला असून  घटनेनंतर बँक मॅनेजर (बँक व्यवस्थापक)रोहित दयाराम साहू रा.पठावाले,खरगापूर,जि.टिकमगढ,मध्य प्रदेश हा फरार झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,भंडारा शहराच्या गांधी चौक या ठिकाणी मनप्पुरम गोल्ड लोन नावाची बँक आहे.सदर बँकेकडून सोने गहाण ठेवून कर्ज स्वरूपात रक्कम दिली जाते.त्यामुळे हिमांशू अमित जोशी यांना वडिलांच्या आजारपणामुळे पैशाची गरज होती.हिमांशू हे मनप्पुरम गोल्ड लोन बँकेचे खाते धारक आहेत.पैश्याची गरज असल्याने हिमांशू यांनी गोल्ड लोन बँकेमध्ये १९ जुलै २०२५ रोजी तब्बल २९२ ग्राम सोने गहाण ठेवले होते.या बदल्यात हिमांशू यांच्या युको बँकेच्या बचत खात्यात १८ लाख ७२ हजार रुपयांची रक्कम जमा झाली.मात्र,काही अपरिहार्य कारणांमुळे हिमांशू यांच्या वडिलांची शस्त्रक्रिया महिनाभर लांबली.त्यामुळे गोल्ड लोनची ही रक्कम त्यांच्या खात्यात तशीच पडून राहिली.पैशाची गरज नसल्याने खात्यावर जमा असलेली रक्कम परत करण्यासाठी हिमांशू मनप्पुरम गोल्ड लोन बँकेत गेले.बँक व्यवस्थापक रोहित साहू यांनी गोल्ड लोन खात्यात रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी दोन कोरे धनादेश घेतले आणि सध्या सर्व्हर डाऊन आहे,दोन दिवसांत रक्कम खात्यात आल्यावर सोने परत घेऊन जाल,असे सांगितले.हिमांशू जोशी यांनी मनप्पुरम गोल्ड लोन बँकेत सोने गहाण ठेवले होते.मात्र, व्यवस्थापक साहू याने त्या सोन्यापैकी ३४ ग्राम सोने मनप्पुरममधून काढून अन्य बँकेत स्वतःच्या नावाने गहाण ठेवल्याचाही प्रकार उघडकीला आला.हिमांशू जोशी यांनी बँक व्यवस्थापक रोहित साहू याला जे दोन कोरे धनादेश दिले होते, त्याआधारे साहू याने त्याच्या पत्नीच्या खात्यावर अनुक्रमे १६ लाख ८१ हजार ८०० व २५ हजार रुपये,असे एकूण १७ लाख ७६ हजार ८०० रुपयांची रक्कम वळती केली. आरटीजीएसच्या सहाय्याने रक्कम वळविल्याचे स्टेटमेंटमध्ये उघडकीस आली आहे.अश्यातच हिमांशूच्या वडिलांनी बँक मॅनेजर रोहित साहू याला फोन केला असता त्याने, ‘मी माझी लाइफ सेट केली, पैसे देणार नाही,असे उत्तर दिल्याने अमीत जोशी यांना आश्चर्याचा धक्काच बसला.
  • उल्हास भुसारी,ठाणेदार भंडारा👇
फसवणूक प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.त्या दिशेने आमचा तपास सुरू असून योग्य ती कारवाई केली जाईल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!