Tuesday, August 11, 2026
Homeगडचिरोलीतब्बल १३ मार्ग पुरामुळे बंद; भामरागड शहरातील नागरिकांच्या वस्त्यांत पाणी..

तब्बल १३ मार्ग पुरामुळे बंद; भामरागड शहरातील नागरिकांच्या वस्त्यांत पाणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे.भामरागड, अहेरी,चामोर्शी व इतर तालुक्यात आज दिवसभर कोसळधारा सुरू होत्या.नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन लगतची गावे पाण्याच्या विळख्यात सापडू लागली आहेत.अश्यातच आज,मंगळवार १९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास भामरागड शहरातील नागरिकांच्या वस्त्यांत तसेच दुकानांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची माहिती आहे. पाण्यामुळे अनेक नागरिकांच्या जीवनावश्यक साहित्यांचे नुकसान झाले आहे.आपत्ती व्यवस्थापन प्रशासन अलर्ट मोडवर येत नागरिकांच्या मदतीला धावून गेले.त्यातच सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील तब्बल १३ मार्ग पुरामुळे बंद पडलेली आहेत.पुराचे पाणी पुलावरून वाहत असतांना पुल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
  • पुरामुळे बंद असलेले मार्ग👇
  • हेमलकसा भामरागड राष्ट्रीय महामार्ग-१३० डी (पर्लकोटा नदी)ता.भामरागड
  • अहेरी वटरा रस्ता राज्यमार्ग ३७० (वटरा नाला)ता.अहेरी
  • तळोधी आमगाव महाल विसापूर राज्यमार्ग-३८१(पोहार नदी)ता.चामोर्शी
  • कुरखेडा वैरागड रस्ता राज्यमार्ग-३७७(सती नदी)ता.कुरखेडा
  • चौडमपल्ली चपराळा रस्ता प्रजिमा-५३ स्थानिक नाला)ता.चामोर्शी
  • कढोली ते उराडी रस्ता प्रजिमा-७(स्थानिक नाला) ता.कुरखेडा
  • शंकरपूर ते डोंगरगाव रस्ता प्रजिमा-१ ता. देसाईगंज
  • कोकडी ते तुळशी रस्ता प्रजिमा-४९ ता. देसाईगंज
  • कोंढाळा कुरुड वडसा रस्ता प्रजिमा-४७ ता. देसाईगंज
  •  पोरला वडधा रस्ता प्रजिमा-७ ता.कुरखेडा
  • भेंडाळा बोरी गणपूर रस्ता प्रजिमा-१७ (हळदीमाल नाला)
  • हलवेर ते कोठी रस्ता इजीमा-२४ ता.भामरागड
  • गडचिरोली चांडाळा गुरवळा रस्ता राज्यमार्ग-३७९ ता.गडचिरोली
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई; ४६ लाख रुपये किंमतीचा चीज ॲनालॉग व दही नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्रात पनीर सारखे दिसणारे चीज ॲनालॉगचे उत्पादन,साठवणूक,वितरण आणि विक्रीवर प्रतिबंध असतांनाही काही विक्रेते ग्राहकांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात चीज ॲनालॉगची विक्री...

बेशरमीची हद..! शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष बनण्यासाठी मुलांना टाकतात जिल्हा परिषद शाळेत.. – कोंढाळा जिल्हा परिषद शाळेतील प्रकार..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या नावारूपास आलेल्या "पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा" कोंढाळा येथील शाळा व्यवस्थापन समितीचे चित्र गेल्या दोन वर्षांपासून पार बदलून...

सर्पदंश दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची शासकीय मदत जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत घडलेली सर्पदंशाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आश्रमशाळांमधील विद्यार्थी सुरक्षेचा...

अचानक विजांचा लखलखाट; विज कोसळून महिलेचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव येथील राजुली जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या उत्तरा उत्तम थेर वय ४७ वर्षे या महिला गुराखीचा वीज कोसळून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!