Monday, August 10, 2026
Homeचंद्रपूरमोठी दुर्घटना टळली; ट्रॅक्टर धुण्यासाठी गेला अन् क्षणात पुराने घातला वेढा..!

मोठी दुर्घटना टळली; ट्रॅक्टर धुण्यासाठी गेला अन् क्षणात पुराने घातला वेढा..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-पावसाने हाहाकार माजविल्याने हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांच्या धानपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सर्वत्र नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.त्यातच आजूबाजूचे पाणी गोळा होऊन नाल्यांनाही नदीचे स्वरूप आल्याचे दिसून येत आहे.चंद्रपूर जिल्ह्यात चोवीस तास मुसळधार पाऊस कोसळल्याने अनेक ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.अश्यातच आज,मंगळवारी दुपारच्या सुमारास मोठी दुर्घटना होता-होता टळली.एका शेतकऱ्याने गावानजीक असलेल्या नाल्यावर ट्रॅक्टर धुण्यासाठी नेले असता सुरुवातीला नाल्यातील पाण्याची पातळी कमी असल्याने ट्रॅक्टर तर धुतले.मात्र,काही कालावधीसाठी ट्रॅक्टर वरील पाणी सुकावे,यासाठी तो गावात गेला अन् क्षणात पुराने वेढा घातला तो पाण्यामुळे ट्रॅक्टरच दिसेनासा झाल्याची घटना आज,मंगळवार १९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील सुर्ला गाव परिसरात घडली.
शेतीचा रोवणी,चिखलणी हंगाम संपल्याने ट्रॅक्टर वरील चिखल व माती निघावी यासाठी सुर्ला गावातील आकाश बारसी यांनी आज मंगळवारी दुपारच्या सुमारास गावालगतच्या नाल्यावर ट्रॅक्टर धुण्यासाठी नेला होता.ट्रॅक्टर धुवून स्वच्छ केला,त्यावेळी नाल्यात पाणी कमी होते.त्यानंतर नाल्यावरील पुलावर ट्रॅक्टर ठेवला आणि पाणी सुकावे म्हणून गावात गेले.काही वेळाने ट्रॅक्टर नेण्यासाठी आकाश बारसी हे नाल्याकडे परतले असता,पाण्याचे रौद्र रूप पाहून क्षणात ट्रॅक्टर दिसेनासा झाला.घटनेची माहिती ग्रामस्थांना होताच बघ्यांनी एकच गर्दी केली.ट्रॅक्टर धूत असतांनाच पाण्याचा प्रवाह वाढला असता तर मोठा अनर्थ घडला असल्याची प्रतिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुःखद घटना..! तीन शालेय विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; तर अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल...

आरमोरी येथे आरपीआयची बैठक संपन्न; विविध विषयांवर विचारमंथन..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आरपीआय)च्या वतीने आरमोरी येथील विश्राम गृहात नुकतीच पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासह विविध सामाजिक,राजकीय...

देसाईगंजच्या शंकरपूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या  आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना शाखा शंकरपूर यांच्या वतीने आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन...

आता गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर आकारला जाणार दहापट दंड..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला प्रभावी आळा घालण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,१९६६ मधील कलम ४८(७)मध्ये सुधारणा करण्यास मंगळवार २८ जुलै...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!