Monday, August 10, 2026
Homeदेसाईगंजकुरुड येथे ५० कार्यकत्यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश..

कुरुड येथे ५० कार्यकत्यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज(गडचिरोली):- राजकिय पक्ष केवळ बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा लावुन समाजाची दिशाभूल करतात.मात्र,संवैधानिक अधिकाराच्या लढ्यासाठी केवळ ॲड.बाळासाहेब आंबेडकरच लढतात,हे सत्य आंबेडकरी समाजाला आता पटु लागले आहे.सोमनाथ सुर्यवंशी यांची पोलिस कोठडीत हत्या करण्यात आली,महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत ७६ लाख मतदान वाढले कसे,बौद्ध गया बुद्ध विहारात मनुवाद्यांचा हस्तक्षेप अश्या विविध बाबिंवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर सुप्रिम कोर्टात लढा देवून समाजाला न्याय मिळवुन देत असल्याने आता आंबेडकरी समाजाची दिशाभूल कोनताही राजकीय पक्ष करु शकत नाही.बाळासाहेब उपाख्य प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव राजरतन मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष प्रा.भीमराव शेन्डे,देसाईगंज शहर अध्यक्ष प्रा.अशोक मेश्राम,इंजि.प्रमोद मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत देसाईगंज तालुक्याच्या कुरुड येथील तब्बल ५० महिला व पुरुषांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.प्रसंगी कार्यकारणीचे गठणही करण्यात आले.यामध्ये महिला कार्यकारणीच्या अध्यक्षपदी प्रियंका मेश्राम,उपाध्यक्ष सुनंदा मेश्राम, सचिव कल्पना बोरकर, सहसचिव रशिका धोंगडे, कोषाध्यक्ष वंदना घोडेस्वार, संघटक कल्याणी वासनिक,सहसंघटक पल्लवी उके, सदस्य वृंदा सुखदेवे,चित्रा गणविर,सिंधू देशपांडे,देवांगणा डोंगरे,बेबी भीमटे,मालता मेश्राम,शिला गणविर,उर्मिला मेश्राम,हर्षिला डोंगरे,मनोरमा डोंगरे,मंदा घोडेस्वार, धर्मशिला तिरपुडे,शालू डांगे,शांता खोब्रागडे,नंदा बागडे, यामिनी मेश्राम,यशवंता वासनिक,ललिता टेंभुर्णे, निर्मला गणविर,फुलाबाई गजभीये,सरुपमा गजभीये, सपना मेश्राम,अल्का मेश्राम,उषा हुमने, तानाबाई उके तर पुरुष कार्यकारणीत अध्यक्ष पुरुषोत्तम देशपांडे,उपाध्यक्ष खुषाल मेश्राम,सचिव संदेश मेश्राम,सहसचिव कुंदन देशपांडे,संघटक दादाराव घोडेस्वार,सदस्य साजन सुखदेवे,पितांबर गणविर,अमरदिप बागडे,गौतम उके,सुधनवा बोरकर,पृथ्विराज डांगे,नाशिक घोडेस्वार,बबनराव गणवीर यांचा समावेश असून सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा देण्यात आले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुःखद घटना..! तीन शालेय विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; तर अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल...

आरमोरी येथे आरपीआयची बैठक संपन्न; विविध विषयांवर विचारमंथन..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आरपीआय)च्या वतीने आरमोरी येथील विश्राम गृहात नुकतीच पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासह विविध सामाजिक,राजकीय...

देसाईगंजच्या शंकरपूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या  आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना शाखा शंकरपूर यांच्या वतीने आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन...

आता गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर आकारला जाणार दहापट दंड..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला प्रभावी आळा घालण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,१९६६ मधील कलम ४८(७)मध्ये सुधारणा करण्यास मंगळवार २८ जुलै...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!