- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-नुकताच भंडारा शहरातील गोल्ड लोन बाबतचा प्रकरण १८ ऑगस्ट रोजी उघडकीस आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. अश्यातच आता आपली रक्कम लवकरात-लवकर परत मिळावी,यासाठी बँक खातेधारकाच्या वडिलांनी दुसऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून चक्क पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर विष प्राशन करून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना उघडकीस आली आहे.काल गुरुवारी दुपारच्या सुमारास,जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन अमित जोशी यांनी पोलिस अधीक्षकांना भेटण्याचा प्रयत्न केला.पोलीस अधीक्षक बाहेर कामानिमित्त गेले असल्याने भेट होऊ शकली नाही. यादरम्यान,त्यांनी सोबत आणलेले वीष प्राशन केले. सदरची बाब पोलिसांच्या निदर्शनास येताच, लागचीच जोशी यांना तात्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले.सध्या अमित जोशी यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.आपणास हे कृत्य करण्यासाठी एका व्यक्तीने प्रोत्साहित केले,असे केल्यास रक्कम लवकर परत मिळेल,असे सांगण्यात आल्याचे अमित जोशी यांनी भंडारा पोलिसांना दिलेल्या बयानात नमूद केल्याने एकच खळबळ उडाली आहे.प्रकरणी विष प्राशन करण्यास परावृत्त करणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
- नेमके प्रकरण काय?👇
भंडारा शहराच्या गांधी चौक या ठिकाणी मनप्पुरम गोल्ड लोन नावाची बँक आहे.सदर बँकेकडून सोने गहाण ठेवून कर्ज स्वरूपात रक्कम दिली जाते.त्यामुळे हिमांशू अमित जोशी यांना वडिलांच्या आजारपणामुळे पैशाची गरज होती.हिमांशू हे मनप्पुरम गोल्ड लोन बँकेचे खाते धारक आहेत.पैश्याची गरज असल्याने हिमांशू यांनी गोल्ड लोन बँकेमध्ये १९ जुलै २०२५ रोजी तब्बल २९२ ग्राम सोने गहाण ठेवले होते.या बदल्यात हिमांशू यांच्या युको बँकेच्या बचत खात्यात १८ लाख ७२ हजार रुपयांची रक्कम जमा झाली.मात्र,काही अपरिहार्य कारणांमुळे हिमांशू यांच्या वडिलांची शस्त्रक्रिया महिनाभर लांबली.त्यामुळे गोल्ड लोनची ही रक्कम त्यांच्या खात्यात तशीच पडून राहिली.पैशाची गरज नसल्याने खात्यावर जमा असलेली रक्कम परत करण्यासाठी हिमांशू मनप्पुरम गोल्ड लोन बँकेत गेले.बँक व्यवस्थापक रोहित साहू यांनी गोल्ड लोन खात्यात रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी दोन कोरे धनादेश घेतले आणि सध्या सर्व्हर डाऊन आहे,दोन दिवसांत रक्कम खात्यात आल्यावर सोने परत घेऊन जाल,असे सांगितले.हिमांशू जोशी यांनी मनप्पुरम गोल्ड लोन बँकेत सोने गहाण ठेवले होते.मात्र, व्यवस्थापक साहू याने त्या सोन्यापैकी ३४ ग्राम सोने मनप्पुरममधून काढून अन्य बँकेत स्वतःच्या नावाने गहाण ठेवल्याचाही प्रकार उघडकीला आला.
हिमांशू जोशी यांनी बँक व्यवस्थापक रोहित साहू याला जे दोन कोरे धनादेश दिले होते,त्याआधारे साहू याने त्याच्या पत्नीच्या खात्यावर अनुक्रमे १६ लाख ८१ हजार ८०० व २५ हजार रुपये,असे एकूण १७ लाख ७६ हजार ८०० रुपयांची रक्कम वळती केली. आरटीजीएसच्या सहाय्याने रक्कम वळविल्याचे स्टेटमेंटमध्ये उघडकीस आली आहे.अश्यातच हिमांशूच्या वडिलांनी बँक मॅनेजर रोहित साहू याला फोन केला असता त्याने, ‘मी माझी लाइफ सेट केली, पैसे देणार नाही,असे उत्तर दिल्याने अमीत जोशी यांना आश्चर्याचा धक्काच बसला.
- Advertisement -

