Saturday, May 2, 2026
Homeभंडाराघटनेच्या ४८ तासानंतर अधिकाऱ्यांचा तबादला.. - ऑर्डनन्स फॅक्टरीतील स्फोट प्रकरण...

घटनेच्या ४८ तासानंतर अधिकाऱ्यांचा तबादला.. – ऑर्डनन्स फॅक्टरीतील स्फोट प्रकरण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-भंडाराच्या जवाहरनगर येथील आयुध निर्माणी फॅक्टरीत २४ जानेवारी रोजी झालेल्या स्फोटात ८ जणांचा मृत्यू तर ५ जण गंभीर जखमी झाले होते.सुरुवातीला १३ जण ठार झाल्याची बातमी समोर आली होती.त्यानंतर शासनाच्या वतीने मृत पावलेल्यांची इत्यंभूत माहिती प्रसारित करण्यात आली.घटनेनंतर तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तबादला करण्यात आला आहे. यामध्ये आयुध निर्माणीचे मुख्य महाव्यवस्थापक सुनील सप्रे,महाव्यवस्थापक अनुज किशोर प्रसाद आणि ललित कुमार यांचा समावेश आहे.आयुध निर्माणीचे नवे मुख्य महाव्यवस्थापक म्हणून दीपक उद्धवराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.याआधी देशमुख पुणे येथे महाव्यवस्थापक पदावर होते.स्फोटाच्या घटनेच्या ४८ तासानंतर बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
आयुध निर्माणीच्या लो टेम्परेचर प्लास्टिक एक्सपोजर २३ इमारतीत शुक्रवार २४ जानेवारी रोजी सकाळी १०.४० वाजता भीषण स्फोट झाला होता.या घटनेत ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.तर पाच जण गंभीर जखमी झाले.या घटनेनंतर तीन वेगवेगळ्या पथकांनी तपास सुरू केला आहे.या घटनेनंतर २६ जानेवारी रोजी आयुध निर्माणी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.दीपक देशमुख यांच्याकडे तात्काळ पदाचा कार्यभार सोपवून पुण्यातील मुख्यालय गाठण्याचे आदेश भंडाऱ्याचे मुख्य महाव्यवस्थापक सुनील सप्रे यांना देण्यात आले आहेत.तर अनुज किशोर प्रसाद हे भंडारा येथे राहून पुणे मुख्यालयाच्या आदेशानुसार भंडारा येथील कारखान्यात काम करणार आहेत.कामाचा अहवाल पुणे मुख्यालयाला द्यावा लागणारा आहे.तर महाव्यवस्थापक ललित कुमार यांना पुणे मुख्यालयातील सुरक्षा विभागात पाठवण्यात आले आहे.स्फोटाच्या घटनेनंतरची ही पहिलीच कारवाई आहे.संरक्षण मंत्रालयाने ही स्फोटाची घटना गांभीर्याने घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
या स्फोटानंतर केंद्र सरकारचे चौकशी पथक,रिजनल कौन्सिल ऑफ सोसायटी,महाराष्ट्र सरकार आणि ऑर्डनन्स फॅक्टरीचे एक स्थानिक अधिकारी असे एकूण तीन पथक या घटनेचा तपास करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!