- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यातील दिव्यांगांच्या समस्या आणि हक्कांसाठी काल,२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी करण्यात आलेल्या लक्षवेधी आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे.जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी २० कोटी रुपये अतिरिक्त निधी मंजूर करण्याचे तसेच विशेष ॲम्ब्युलन्स सेवा आणि दिव्यांग भवन स्थापन करण्याचे आश्वासन गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिले आहे.आंदोलनस्थळी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे
आमदार मिलिंद नरोटे,माजी खासदार अशोक नेते, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा,पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी भेट दिली.सदर आंदोलन मागे घेतांना दिव्यांग आंदोलनाचे प्रमुख नेते अप्रव भैसारे यांनी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे स्वागत केले.मात्र,राज्यातील सर्व दिव्यांगांना ६ हजार रुपये मासिक पेन्शन मिळवून देण्यासाठी लढा सुरूच राहील,असा ठाम इशाराही त्यांनी दिला.
भैसारे यांनी म्हटले की, “गडचिरोलीसाठी मिळालेला निधी ही मोठी उपलब्धी असून संपूर्ण राज्यातील दिव्यांगांच्या न्यायहक्कांसाठी आम्ही मागे हटणार नाही.पेन्शन वाढीचा प्रश्न हा प्रत्येक दिव्यांगाचा हक्क आहे आणि तो मिळवण्यासाठी संघर्ष सुरूच राहील.” सदर आंदोलनास प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष निखील धार्मिक,अरविंद धकाते,अनंता भोयर,गोरक्षा कुरुडकर, विकास धंदरे,संदीप कराडे,तेजप्रकाश उईके,राकेश कराडे,दिनकर कुथे,रामू लांजेवार,आशिष विश्वास,गोलु ठाकरे,अर्चना मडावी,चेतन हेडावू,रंजना गोन्नाडे,पुजा लठ्ठे,प्रहार कार्यकर्ते तथा दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष मनोज उराडे यांनी पाठींबा दर्शविला होता.हे विशेष.आंदोलनामुळे गडचिरोली जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी अनेक सकारात्मक निर्णय होतील,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
- Advertisement -

