Saturday, May 2, 2026
Homeकुरखेडापोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल झाल्याने आज,शनिवारी दोन्ही पात्र उमेदवारांचा समाज बांधवांच्या वतीने पुष्पगुच्छ,शाल व भेटवस्तू देत सत्कार करण्यात आला.
नुकतीच जिल्हा पोलीस भरतीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कुरखेडा शहरातील जाकीर शेख यांची कन्या आफरीन शेख व फीरोज उर्फ पप्पू खान यांचे सूपूत्र अदनान खान हे पात्र ठरले.यांचा आज समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. मुस्लिम समाजात शिक्षणाच्या बाबतीत उदासीनता आहे.विशेषतः मुस्लिम युवक व युवती शिक्षण घेत आपण शासकीय, खाजगी सेवेत दाखल होऊन आपले भविष्य घडवू शकतो,या आत्मविश्वासाचा अभाव आहे.मात्र, आफरीन हिच्या यशाने मुस्लिम समाजातील युवतींनाही बळ व प्रेरणा मिळेल,असा विश्वास यावेळी समाजाचे अध्यक्ष हाजी मसूद शेख यांनी व्यक्त केला.याप्रसंगी मुस्लिम समाज मंडळाचे उपाध्यक्ष शमीम शेख,आसिफ शेख, जियाभाई सय्यद,शहेबाज शेख, उस्मान पठाण, जाकीर शेख,नसीम पठाण व मुस्लिम बांधव उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!