- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी असून पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. यासाठी तारीख निश्चित करण्यात आली असून पुढील महिन्याच्या २४ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधून १९ वा हप्ता वितरीत करणार आहेत.
यापूर्वी १८ व्या हप्त्याचे २ हजार रुपये ५ ऑक्टोंबर रोजी वितरीत करण्यात आले होते.
पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत वर्षाला शेतकरी बांधवांच्या खात्यात तीन टप्प्यात दोन हजार रुपये प्रमाणे एकूण सहा हजार रुपये डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर द्वारे थेट जमा केले जातात.त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी थोडाफार हातभार लागत आहे.शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम केल्याने उत्पादकता वाढवता येते आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते.या आर्थिक मदतीतून शेतकरी शेतीसाठी आवश्यक असलेल्या वस्तूंची खरेदी करतात.जेणेकरून त्यांची कामे पूर्ण होतील.
- Advertisement -

