- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-म्हणतात ना..एकदा अंगात गेली की,अनेकजण स्वतःची ओळख तर विसरतात,त्यातच आपण जनतेचे सेवक आहोत; हेही कर्मचारी विसरत असतात.कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी हा जनतेचा लोकसेवक आहे; तर आमदार,खासदार आणि मंत्री हे जनतेचे लोकप्रतिनिधी असतात.अशातच मी करेन ती पूर्वदिशा अशा आविर्भावात जाणारा मोठी दिघोरी येथील तलाठी रोशन खवास अत्यंत बेजबाबदारपणाचे उदाहरण असून,कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत मद्य प्राशन करून येत असल्याने शेतकरी,शालेय विद्यार्थी तथा ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शासनाच्या आदेशानुसार स्थानिक महसूल अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहणे अनिवार्य आहे. येथील तलाठी कधीच मुख्यालयी राहत नाहीत.त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना अनेक प्रकारची कामे येत असतात. त्यामध्ये शेतकऱ्यांना धान्य खरेदी केंद्रावर सातबारा व आठ अ ची आवश्यकता भासत असते.कृषी कर्ज अणि विविध शासकीय कामांसाठी तलाठी कार्यालयाकडून अनेक दाखले महत्त्वाचे असतात. यासोबतच शालेय विद्यार्थ्यांना विविध कामांसाठी तलाठी कार्यालयातील दाखल्यांची गरज असते.परंतु येथील तलाठी कधीही कार्यालयीन वेळेवर उपस्थित राहत नाहीत.उपस्थित असलेच तर झिंगलेल्या अवस्थेत असतात.पूरबाधित पंचनामा, धानाची व इतर पिकांच्या नुकसानीचे पंचनामे अंदाजे करीत असून, बाधित शेतकरी शासकीय लाभापासून वंचित राहत आहेत.याबाबत शेतकऱ्यांनी काही विचारणा केल्यास कार्यालयात आलेल्या प्रत्येकाशी हुज्जत घालून वेळ मारून नेतात. त्यामुळे शेतकरी असो वा विद्यार्थी सर्वांची कामे रेंगाळलेली आहेत.याबाबत ग्रामस्थांनी तथा लोकप्रतिनिधींनी अनेकदा तहसील कार्यालयात भ्रमणध्वनी तथा अर्ज करुन तक्रार दाखल केली; पण तात्पुरती तंबी देण्यात येते.मात्र, प्रत्यक्षात कोणतीही करवाई केली गेली नाही.तलाठ्यावर कारवाई करून निलंबित करण्यात यावे; अशी मागणी दिघोरी ग्रामस्थांनी केली आहे.
विजय खोब्रागडे,सरपंच, दिघोरी👇
वारंवार संबंधित विभागाला सूचना व तक्रार देऊनही काहीही उपयोग झाला नाही.मागील आठवड्यात तलाठी हे अति मद्य प्राशन करून आल्याची माहिती शेतकऱ्यांनी देताच ग्रामपंचायत कमिटीसह तलाठ्याला तंबी देऊन आलो,तरीसुद्धा नेहमी मद्य प्राशन करूनच कार्यालयात येतात.
- Advertisement -

