- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-राज्यातील विधानसभा निवडणूक येत्या २० नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे.अशातच काही गावकरी वा काही नागरिक निवडणुकीवर बहिष्कार घालून मतदान न करण्याचा निर्णय घेत असतात.त्याचे कारण म्हणजे,निवडणुकीपूर्वीच्या लोकप्रतिनिधिंनी गेल्या अनेक वर्षात गावकऱ्यांच्या वा नागरिकांच्या
विविध समस्यांकडे लक्ष न देणे,आपल्याच धुंदीत असणे,गैरवर्तन करणे,जवळच्याच लोकांना कामे वाटप करणे,मतभेद करणे व इतर अशा अनेक नानाविध प्रकारची कारणे उपस्थित होऊन निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घेतला जातो.मात्र,निवडणुकीवर बहिष्कार न घालता आपल्या समस्या सोडवण्यासाठी हक्काने एक चांगला प्रतिनिधी निवडून देण्यासाठी आपल्या मताधिकाराचा उपयोग करणे आवश्यक आहे.गेल्या अनेक वर्षात ज्यांनी लक्ष न दिलेले गाव वा ज्या भागातील तसेच नागरिकांच्या विविध समस्या सोडविल्या नाहीत; अशांना धडा शिकवून वैतागलेल्यांनी गावातील समस्या दूर करण्यासाठी लोकशाही पद्धतीने आपल्या मताधिकारांचा उपयोग करून एक चांगला लोकप्रतिनिधी निवडून पाठविण्यात आपली भूमिका पार पाडली पाहिजे.अनेकांच्या मते,निवडून आलेले हे ‘एकाच माळ्याचे मनी’ असतात.हे सत्य जरी असले तरीही आपणच यांस सर्वस्वी जबाबदार आहोत.मुख्यत्वे म्हणजे,दर पाच वर्षांनी बदल करणे गरजेचे आहे. ‘जो करेल काम त्यालाच ठेऊ ठाम’ अशी भूमिका महत्वाची मानली जाते.अन्यथा ‘तोच बोवा येतो आणि तोच बोवा जातो’ असे झाल्यास ‘विकास ऐवजी भकास’ झाल्याशिवाय राहणार नाही.त्यामुळे निवडणुकीवर बहिष्कार घालून आपले हक्क सोडू नये; आपले अमूल्य मत हक्काने एक चांगला प्रतिनिधी निवडून देण्यासाठी वापरावे.
- Advertisement -

