- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-जेव्हा-केव्हा आपण घरगुती गॅस वा व्यावसायिक गॅस सिलेंडर खरेदी करतो,अशावेळी गॅस एजन्सी धारक सिलेंडर वजन करून तर देतच नाही व आपणही अंगाला हळद लावून घेत नाही. मात्र,गॅस सिलेंडर खरेदी करतांना गॅस वजन काट्यावर मोजमाप करून देणे अनिवार्य आहे व तसा नियमही आहे.सिलिंडर घेतांना वजन करा.आपल्या सिलिंडरमध्ये तब्बल अडीच किलो गॅस कमी असते.गोंदियात गॅसचा काळा बाजार करणारे रॅकेट सक्रिय असल्याची विश्वसनीय माहिती आहे.नुकताच असा प्रकार उघडकीस आला आहे.घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची तपासणी करून वजन केल्यास गॅस चोरी होत असल्याचा दाट संशय आल्याशिवाय राहणार नाही.प्रत्येक सिलिंडरमध्ये दोन ते अडीच किलो गॅस कमी असल्याची जोरदार चर्चा शहरासह जिल्ह्यात आहे.
गॅस सिलिंडर देताना ग्राहकांना त्याची पावती देणे अपेक्षित असतांना सिलिंडरसोबत ग्राहकांना पावती दिली जात नाही.यावर तहसील कार्यालयातून काहीच कारवाई केली जात नाही.गॅस सिलिंडर वाटप करणाऱ्या व्यक्तींनी वजनकाटा व गॅस लिकेज मशीन सोबत ठेवणे अपेक्षित असताना गॅस सिलिंडर वाटप करणाऱ्यांकडे वजनकाटा व लिकेज मशीन उपलब्ध राहत नाही.त्याची अधिकाऱ्यांनी सक्ती करावी.
- Advertisement -

