Saturday, May 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तकमला हॅरिस यांचा पराभव करीत पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४७ वे...

कमला हॅरिस यांचा पराभव करीत पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४७ वे राष्ट्रपती…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष बनले आहेत.त्यांनी कमला हॅरिस यांचा पराभव करीत पुन्हा एकदा अमेरिकेचे अध्यक्षपद मिळवले आहे.डोनाल्ड ट्रम्प यांनी २७० चा बहुमताचा आकडा पार करीत विजय मिळवला.
फॉक्स न्यूजनुसार,डोनाल्ड ट्रम्प यांना २७७ इलेक्टोरल मते मिळाली आहेत.त्याचवेळी कमला हॅरिस यांना केवळ २२६ इलेक्टोरल मते मिळाली आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्यासह त्यांच्या समर्थकांना संबोधित करायला पोहोचले.यावेळी ट्रम्प यांनी विजयाचा आनंद असल्याचे सांगितले,तसेच त्यांनी सर्व मतदारांचे आभार मानले आहेत.हा इतिहासातील सर्वात मोठा राजकीय क्षण असल्याचे ट्रम्प म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प आपल्या मतदारांना संबोधित करीत म्हणाले की, ‘आम्ही मतदारांसाठी सर्व काही ठीक करणार आहोत.आपल्या देशाने याआधी कधीही न पाहिलेला हा ऐतिहासिक राजकीय विजय आहे. ४७ वे राष्ट्रपती म्हणून मी तुमच्यासाठी रोज लढेन.हा अमेरिकेचा मोठा विजय आहे,ज्यामुळे अमेरिका पुन्हा महान होईल.आपण जेशाच्या सीमा अधिक मजबूत करु आणि देशातील सर्व प्रश्न सोडवू’.
अमेरिकेच्या अध्यक्षाची निवडणूक ही एक अप्रत्यक्ष प्रक्रिया असते,ज्यामध्ये सर्व राज्यांतील नागरिक इलेक्टोरल कॉलेजच्या ठराविक सदस्यांना मतदान करतात.या सदस्यांना इलेक्टर्स म्हणतात.हे इलेक्टर्स नंतर प्रत्यक्ष मते देतात ज्याला इलेक्टोरल मते म्हटले जाते.त्यांची मते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करतात.इलेक्टोरल मतांमध्ये बहुमत मिळविणारे उमेदवार अमेरिकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून निवडले जातात.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!