Wednesday, April 29, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोलीचे पत्रकार सुरज गुंडमवार राज्यस्तरीय ‘शिवछत्रपती पुरस्कार-२०२६’ ने सन्मानित..

गडचिरोलीचे पत्रकार सुरज गुंडमवार राज्यस्तरीय ‘शिवछत्रपती पुरस्कार-२०२६’ ने सन्मानित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-सामाजिक,शैक्षणिक व बहुउद्देशीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आश्रयआशा फाऊंडेशन मालेगाव(जि.नाशिक)तर्फे प्रदान करण्यात येणारा यंदाचा राज्यस्तरीय ‘शिवछत्रपती पुरस्कार-२०२६’ गडचिरोलीचे पत्रकार सुरज गुंडमवार यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र राऊत पाटील तथा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
समाजहितासाठी अविरत कार्य करत विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे,वंचित घटकांच्या समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे,प्रशासन व नागरिक यांच्यात समन्वयाचा सेतू निर्माण करणे तसेच निर्भीड व लोकाभिमुख पत्रकारितेद्वारे लोकहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे या कार्याची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.नुकताच मालेगाव येथे आयोजित करण्यात आलेला पुरस्कार वितरण सोहळा भव्य व दिमाखदार वातावरणात पार पडला.तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.यावेळी सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार,विविध संघटनांचे पदाधिकारी,महिला प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी विशेष पोलीस  महानिरीक्षक व लोकसेवा आयोग सदस्य प्रतापराव दिघावकर,डॉ.अमोल शेजवळ लासलगाव,प्रा.सी.डी.रोटे निफाड‌,संजय देशमुख देशमुख संस्थापक अध्यक्ष,साईधनवर्षा फाऊंडेशन,नाशिक तसेच जगन्नाथ पंडित बच्छाव गुरूजी कौळाणे(नि), आश्रयआशा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र राऊत पाटील,उपाध्यक्ष राजेंद्र पवार,सचिव आशाताई बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली संस्था सामाजिक,शैक्षणिक व बहुउद्देशीय उपक्रम राबवत असून राज्यभरात कार्याचा विस्तार करत आहे.समाजातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्याची परंपरा संस्थेमार्फत सातत्याने जपली जात आहे.राज्यस्तरीय ‘शिवछत्रपती पुरस्कार-२०२६’ हा सन्मान सुरज गुंडमवार यांच्या प्रामाणिक,निर्भीड व लोकाभिमुख पत्रकारितेची अधिकृत पावती मानला जात असून गडचिरोली जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.
नक्षलग्रस्त व मागास जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीमध्ये अनेक वर्षांपासून पत्रकारिता व माहिती अधिकार क्षेत्रात कार्यरत राहून त्यांनी सामाजिक न्यायासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.गरिब-गरजूंना हक्क मिळवून देणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे व जनजागृती करणे या कार्यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
सुरज गुंडमवार हे युवा मराठा न्यूजचे ब्युरो चीफ असून,माहिती अधिकार पत्रकार संरक्षण पोलिस मित्र समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष, तसेच पोलीस बॉईज संघटना महाराष्ट्र राज्याचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.त्यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय सन्मानाबद्दल गडचिरोली जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता ‘त्या’ आमदार अन् खासदारांना उठून अभिवादन करण्याची गरज नाही..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील कित्येक आमदार आणि खासदारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. अश्यातच काहीजणांवर फौजदारी कारवाई झालेली वा इतर प्रकरणात दोषी ठरलेले...

यंदाही होणार बौद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात वन्यप्राण्यांची गणना..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-बौद्ध पौर्णिमेच्या रात्री देशातील सर्व अभयारण्यातील वन्यजीवांची गणना केली जाते. त्यासाठी अभयारण्याच्या परिसरात वनविभागातर्फे मचाण उभारल्या जातात.त्यावर बसून वनविभागाचे कर्मचारी सर्व...

तीनजण नदीत बुडाले; वडील मुलगी आणि भाची..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या बाप- लेकीचा तसेच भाचीचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज, मंगळवार २८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या...

सेवा हक्क दिनानिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना नागरिकांना पारदर्शक,वेळेत व सुलभ सेवा देण्याची शपथ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सेवा हक्क दिनानिमित्त आज,मंगळवार २८ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत नागरिकांना पारदर्शक,वेळेत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!