- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-बौद्ध पौर्णिमेच्या रात्री देशातील सर्व अभयारण्यातील वन्यजीवांची गणना केली जाते. त्यासाठी अभयारण्याच्या परिसरात वनविभागातर्फे मचाण उभारल्या जातात.त्यावर बसून वनविभागाचे कर्मचारी सर्व प्राण्यांची गणना करतात.त्यावरून जंगलात कोणत्या प्रकारचे,किती प्राणी आहेत,याची माहिती वनविभागाला मिळते.त्यानुसार,दरवर्षीप्रमाणे यंदाही गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रअंतर्गत राष्ट्रीय उद्यान नवेगावबांध येथे कोअर व बफर क्षेत्रात येत्या,शुक्रवार १ मे रोजी बौद्ध पौर्णिमेला निसर्ग अनुभव-२०२६ पार पडणार आहे.यात वनविभागाचे अधिकारी कर्मचारी व निसर्गप्रेमी सहभागी होणार आहेत.त्याकरिता पूर्वतयारी झाली असल्याची माहिती राष्ट्रीय उद्यानाच्या वनपरिक्षेत्राधिकारी प्रतिभा रामटेके यांनी दिली आहे. निसर्ग अनुभव-२०२६ साठी नवेगाव राष्ट्रीय उद्यानाच्या वनपरिक्षेत्राधिकारी प्रतिभा रामटेके यांच्या मार्गदर्शनात व सूचनेनुसार नवेगाव राष्ट्रीय उद्यानात एकूण १९ मचान तयार केलेले आहेत.कोअर व राखीव क्षेत्रामध्ये १९ मचानवर,१९ वनाधिकारी-वनकर्मचारी व ३८ वन्यजीवप्रेमी असे एकूण ५७ जण स्वयंस्फूर्तीने सहभाग घेणार आहेत.दोन मचाण या निसर्ग अनुभवासाठी विशेष व्यक्तींसाठी आरक्षित ठेवलेल्या आहेत,१ मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या दिवसी दुपारी ४ वाजतापासून ते २ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.या दरम्यान वन्यप्राण्यांची नोंद करण्यात येणार आहे.
- Advertisement -

