Tuesday, July 21, 2026
Homeदेसाईगंजगडचिरोली जिल्ह्यातील विविध विषयांवर आमदार मसरामांची मुख्य वनसंरक्षकांशी चर्चा..

गडचिरोली जिल्ह्यातील विविध विषयांवर आमदार मसरामांची मुख्य वनसंरक्षकांशी चर्चा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी नुकतीच गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांची  सदिच्छा भेट घेऊन जिल्ह्यातील वने,वन्यजीव व शेतकऱ्यांशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली.
बैठकीत हत्तीमुळे पिकांचे,घरांचे व इतर मालमत्तेचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आणि योग्य भरपाई देण्याची मागणी करण्यात आली.तसेच वन्यप्राणी रस्ता ओलांडतांना होणाऱ्या अपघातांमध्ये जखमी किंवा मृत्यू झालेल्या नागरिकांना शासनाकडून कोणती मदत व भरपाई दिली जाते,याबाबत स्पष्ट धोरण राबविण्याची मागणी करण्यात आली.याशिवाय,सध्या गडचिरोली जिल्ह्यात हत्तींची नेमके लोकेशन,त्यांच्या हालचालींवर प्रभावी नियंत्रण व नागरिकांना वेळेवर सूचना देण्याची व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात यावा,असे सुचविले.
जंगलालगत असलेल्या शेतीचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी सोलर ऊर्जा कुंपण,फेन्सिंग तार तसेच नैसर्गिक(निलगिरी)कुंपण उभारण्याची मागणी करण्यात आली.वघाळा परिसरात पक्षी संवर्धन व संरक्षणासाठी विशेष उपाययोजना राबविणे,तसेच कोरची तालुक्यातील टिपागड पर्यटन व विकास प्रकल्पाला गती देण्याची मागणीही आमदार मसराम यांनी केली.
गडचिरोली जिल्ह्यातील वन,वन्यजीव संवर्धन, शेतकरी संरक्षण आणि पर्यावरण विकासाशी संबंधित अशा अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर आमदार मसराम यांनी मुख्य वनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित 'इंडिया स्किल्स'(IndiaSkills) आणि 'वर्ल्ड स्किल्स'(WorldSkills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून,त्या-त्या जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या...

मन सुन्न करणारी घटना..! जन्मदातीने दहा महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला अन् मृतदेह खांद्यावर घेऊन पोहचली ठाण्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना आज सोमवारी सर्वत्र उघडकीस आली. एका २६ वर्षीय जनमदात्या आईने स्वतःच्या दहा महिन्याच्या पोटच्या लेकीला संपवून...

कोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहू नये.. -प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर विशेष जनजागृती मोहीम राबवा- आमदार रामदास मसराम

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र,गडचिरोली यांच्या वतीने आज,सोमवार २० जुलै रोजी देसाईगंज पंचायत समिती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!