Monday, October 26, 2026
Homeचंद्रपूरउद्या चंद्रपुरात दाखल होणार चित्रपट कलावंत...

उद्या चंद्रपुरात दाखल होणार चित्रपट कलावंत…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोप उपक्रम ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा परिषद व महानगर पालिकाच्या वतीने उद्या २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम उद्यानात स्वातंत्र्यलढ्यातील शूरवीरांना अभिवादन करण्यात येणार आहे.वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते कार्यक्रम सुरू होईल.शीलाफलक अनावरण,पंचप्रण शपथ,वसुधा वंदन,वीरों का वंदन अंतर्गत स्वातंत्र्य सैनिकांना नमन,ध्वजारोहण व राष्ट्रगीत होणार.सकाळी ८.३० वाजता हुतात्मा स्मारक ते डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम उद्यानपर्यंत अमृत कलश यात्रा निघेल.सायंकाळी ६ वाजता चांदा क्लब वर सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने साद सह्याद्रीची भूमी महाराष्ट्राची अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम होईल.अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पुजा सावंत,गायक नंदेश उमप व अभिनेता श्रेयस तळपदे हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असतील.विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार,अशोक नेते,रामदास आंबटकर,अभिजित वंजारी,सुधाकर अडबाले, कीर्तीकुमार भांगडिया,सुभाष धोटे,किशोर जोरगेवार, प्रतिभा धानोरकर यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उपाययोजनांचे सकारात्मक फलित; गडचिरोली जिल्ह्यात रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये २७ टक्के घट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या नऊ महिन्यांत रस्ते अपघातांतील मृत्यूंच्या संख्येत गतवर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत २७ टक्के घट नोंदविण्यात आली...

विधान परिषद निवडणूक; उद्याला तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या उमेदवारांचा फैसला..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी शुक्रवार २३ ऑक्टोंबर २०२६ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली.यामध्ये नागपूर पदवीधर...

ट्रॅव्हल्सद्वारे विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या तीन महिलांना रंगेहात अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागपूरहून ट्रॅव्हल्सद्वारे विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या मध्य प्रदेशातील तीन महिलांना चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चंद्रपुरातील वरोरा नाका चौकात सापळा...

धावत्या इलेक्ट्रिक बसला भीषण आग; जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-राज्य परिवहन महामंडळाच्या एका धावत्या इलेक्ट्रिक 'शिवाई' बसला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना आज,सोमवार २६ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!