Wednesday, August 26, 2026
Homeगोंदियाराज्य उत्पादन शुल्क विभागाने ढाब्यावरील दारू पार्टीवर मारली धाड.....२२ जणांवर कारवाई; दारू,बीयर,ग्लास,टेबल,खुर्ची...

राज्य उत्पादन शुल्क विभागाने ढाब्यावरील दारू पार्टीवर मारली धाड…..२२ जणांवर कारवाई; दारू,बीयर,ग्लास,टेबल,खुर्ची केले जप्त….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :- रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कुडवा येथील आंगण ढाबा येथे विना परवानगीने दारू पिणे सुरू होते.सदर ढाब्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी २० ऑगस्ट रोजी रात्री सुमारास धाड घालून २२ जणांना दारू पिताना रंगेहात पकडण्यात आले.

गोंदियाच्या बार असोसिएशनने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.आंगण ढाबा येथे काही जण विनापरवानगी दारू पित असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाल्याने,राज्य उत्पादन शुल्क विभागाने पोलिस अधीक्षक डॉ.मनोहर अंचुळे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक डी.बी.काळेल,दुय्यम निरीक्षक गायकवाड,सहायक फौजदार तराटे,जवान डिब्बे, बन्सोड, वाहन चालक भोंडे यांनी २० ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास धाड घालून त्या ढाब्यात दारू पित असलेल्या २२ जणांना रंगेहात पकडले. त्यांच्याजवळून दारू,बीयर,ग्लास,टेबल,खुर्ची जप्त करण्यात आली.

आरोपींवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६८, ८४ अंतर्गत कारवाई करण्यात आली.

सर्व ढाब्यावर सुरु आहे प्रकार

जिल्ह्यातील गोदिया-तिरोडा,गोंदिया-बालाघाट, गोदिया-आमगाव,गोंदिया-कोहमारा,रायपूर-नागपूर या मार्गावर मोठ्या प्रमाणात ढाबे आहेत.या धाब्यावर सर्रासपणे ग्राहकांना दारू उपलब्ध करून दिली जाते. हा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरु आहे, पण खुद्द बार चालकांनाच याचा फटका बसू लागल्याने, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे याची तक्रार केली. या तक्रारीनंतर ही धाड टाकण्यात आली.तोपर्यंत हा सर्व प्रकार बिनधास्तपणे सरु होता.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यातील सर्व शासकिय,खाजगी व धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिटसह संबंधित यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देतांना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे.राज्यातील सर्व शासकीय,खासगी व धर्मदाय आरोग्य संस्थांमधील...

५ टक्के दिव्यांग कल्याण निधीचा शंभर टक्के विनियोग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. – नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा. प्रलंबित UDID नोंदणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रिया...

अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार जमा होण्याचा मार्ग मोकळा..

उद्रेक न्युज वृत्त :-रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.महायुती सरकारने माहे-जुलै-२०२६ च्या हप्त्याच्या...

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!