Sunday, July 12, 2026
Homeभंडारा दोघेही थांबले लॉजमध्ये अन् एकाचा झाला मृत्यू….भंडारा शहरातील घटना...

 दोघेही थांबले लॉजमध्ये अन् एकाचा झाला मृत्यू….भंडारा शहरातील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा:- एका तरुणीसोबत लॉजमध्ये गेलेल्या तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याची घटना भंडारा शहरातील हिरणवार लॉजमध्ये रविवारी घडली.घटनेमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. क्रिष्णा रायभान धनजोडे वय २३ वर्षे राहणार – केशोरी तालुका – कामठी जि.नागपूर असे मृतकाचे नाव आहे.

क्रिष्णाचे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एका २३ वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध होते.२० ऑगस्ट रोजी हे दोघेही भेटण्याकरिता भंडारा येथे आले.शहरात फिरुन काही सामान खरेदी करुन त्यांनी जेवण केले.त्यानंतर शहरातील हिरणवार लॉज येथे मुक्कामी थांबले होते. दरम्यान, सदर तरुणी झोपेतून उठली असता तिने क्रिष्णाला आवाज देऊन उठविण्याचा प्रयत्न केला.परंतु,तो काहीच बोलत नाही.शिवाय त्याच्या शरीराची हालचालही होत नव्हती.त्यामुळे तिने लॉजमधील कर्मचाऱ्यांना बोलावून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन गेले.मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून क्रिष्णाला मृत घोषित केले.याप्रकरणी भंडारा पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रहाटे करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना...

देसाईगंजच्या विहीरगाव(पोटगाव)येथील ‘त्या’ मातेने रुग्णवाहिकेतच दिला गोंडस मुलीला जन्म..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव(पोटगाव)येथील रहिवासी स्वाती चांगदेव नेवारे ह्या माहेरी बाळंतपणासाठी गेल्या असता  आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेद्वारे गोंदियाला रेफर करत असतांनाच काही अंतरावरील मार्गावर...

कुरुडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे शासन स्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यात येतील,अशी ग्वाही आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!