Thursday, August 27, 2026
Homeगडचिरोलीकांग्रेस-भाजपा एकाच माळेचे मणी; स्वतःला रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता माना...- जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर...

कांग्रेस-भाजपा एकाच माळेचे मणी; स्वतःला रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता माना…- जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर रिपाई…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-रिपब्लिकन पार्टीत १७ गटअसले तरी चालेल स्वतःला रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता म्हाणावे; कारण कांग्रेस आणि भाजपा एकच माळेचे मणी असल्याने रिपाईच्या स्थानिक नेत्यांना ते विचारात  घेत नाहीत.निवडणुकीत रिपाईचे सर्व गट आपलेच आहेत.या तोर्‍यात वावरतात त्यामुळे यांचीही जागा रिपाईने दाखविली पाहीजे; अश्या प्रकारचे परखड विचार पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर यांनी आरमोरी येथील पिरिपाच्या कार्यकर्त्या समोर मांडले.रिपब्लिकन पार्टीची आरमोरी तालुका बैठक रेस्ट हाऊस आरमोरी येथे पिरिपाचे कार्याध्यक्ष मुरलीधर भानारकर यांच्या अध्यक्षतेखाली  पार पडली.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा.मुनिश्रर बोरकर तर प्रमुख पाहुणे म्हणुन पिरिपाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र ठवरे,जिल्हा उपाध्यक्ष मारोती भैसारे,सचिन किरणापुरे आदि लाभले होते.याप्रसंगी मुरलीधर भानारकर म्हणाले की,मी गडचिरोली जिल्हयातील सच्चे नेते प्रा.बोरकर यांच्यामुळे मी लोजपातुन रिपाईत आलो.आमच्या दोघांची शक्ती ही जनतेची कामे करण्यासाठी राहील जिल्हयात पक्ष वाढवू; याप्रसंगी मारोती भैसारे,सचिन किरणापूरे राजेंद्र ठवरे यांचीही भाषणे झालीत. कार्यक्रमाचे संचालन शामराव सहारे यांनी केले. कार्यक्रमास लोकमित्र बारसागडे,शैलाब लोखंडे, भगवान मोहीते,देवेंद्र बोदेले,प्रशांत मेश्राम,गिरिधर शेंडे,विजय शेंडे, पाडुरंग टेंभुर्णे,शामराव सहारे,सुभाष आंबेकर,विलास भानारकर,डाकराम टेंभुर्णे,रोशन उके, अनिल बांबोळे,अशोक शामकुळे,प्रमोद सरदारे, नाजुक भैसारे,कृष्णा चौधरी,प्रफुल भानारकर,चरण बारसागडे आदि सहीत बहुसंख्य पिरिपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पैगंबरांच्या जिवनाचा आदर्श घ्या-इमाम फैजल अजहरी – कुरखेडा येथे समाज प्रबोधन मेळावा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ईद मिलादून्नबी(मोहम्मद पैगंबर जयंती)च्या पूर्वसंध्येला मौलाना आझाद चौक कुरखेडा येथे समाज प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!