Friday, October 16, 2026
Homeआरमोरीआरमोरी तालुक्यात जंगली हत्तींचा शिरकाव…-धान पऱ्हेची नासधूस; नुकसानभरपाईची मागणी

आरमोरी तालुक्यात जंगली हत्तींचा शिरकाव…-धान पऱ्हेची नासधूस; नुकसानभरपाईची मागणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

आरमोरी(गडचिरोली) :- आरमोरीतालुक्यातील कोजबी जवळील नदीकिनारी असलेल्या करपडा शेतशिवारात जंगली हत्तींच्या कळपातील एका हत्तीने प्रवेश करीत धान पऱ्हेची नासधूस केले.ही घटना काल,शनिवारी  सकाळच्या सुमारास उघडकीस आली.यामध्ये संबंधित शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने वनविभागाने नुकसान भरपाई द्यावी; अशी मागणी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.मागील काही वर्षापासून जिल्ह्यात संचारित असलेल्या जंगली हत्तींचे कळप मागील काही महिन्यांपासून वडसा वनविभागांतर्गत येत असलेल्या आरमोरी वनपरिक्षेत्रात संचारत आहेत.अशातच २० ते २२ च्या संख्येत असलेल्या हत्तीच्या कळपातील एका हत्तीने तालुक्यातील कोजबी जवळील नदीकिनारी असलेल्या करपडा शेतशिवारात प्रवेश केला.या परिसरातील शेतकऱ्यांनी धानाची पेरणी केली होती.सदर पऱ्हे चांगले बहरावर आले असताना हत्तीने पऱ्हे पायदळी तुडविले.त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.यामध्ये मनोहर मुकुंदा मुल्लेवार यांनी रोवणीकरिता टाकलेल्या पह्यांचेही प्रचंड नुकसान झाले असल्याने त्यांनी वनविभागाने नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!