- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-सुट्टया संपल्याने परतीच्या प्रवासादरम्यान रात्री पत्नीसह भ्रमणध्वनीवर बोलत असतांना
आराम करायचे सांगून जवानाने फोन ठेवला व दुसऱ्या दिवशी दिल्लीला जाताच घरी फोन करण्याचे सांगितले.पण,दुसऱ्या दिवशी ते निजामुद्दीन रेल्वे स्थानकावर पोहचलेच नाही.संपूर्ण प्रवासी खाली उतरून पुढच्या प्रवासाला गेले,पण गुड्डू यांचे सामान जसेच्यातसे डब्यात होते.प्रवासादरम्यान अचानक भारतीय सेनेचा जवान गायब झाल्याने संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती.अशातच धावत्या रेल्वेतून अचानक गायब झालेल्या भारतीय सेनादलातील जवानाचा अखेर १३ दिवसांनी शोध लागला आहे.मध्य प्रदेश येथील बैतुल जिल्ह्यातील चिंचोली गावात तो स्थानिक नागरिकांना सापडला.किरकोळ जखमी असल्याने त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.वरठी पोलिस व पालकांनी घटनास्थळावर धाव घेतली आहे.पुढील तपास सेनादलातील अधिकारी करणार असल्याची माहिती आहे.
भंडारालगतच्या भोजापूर येथील गुड्डू मुकेश सिंग गौड वय २४ वर्षे हा युवक भारतीय सेनेत नोकरीवर होता. लग्न असल्याने तो डिसेंबर महिन्यात सुटीवर स्वगावी आला होता.सुट्या संपवून रुजू होण्यासाठी ३१ डिसेंबरला तो भंडारा रोड रेल्वे स्थानकावरून गाडीत चढला.दरम्यान,तो अचानक गायब झाल्याने खळबळ उडाली होती.कुटुंबीयांच्या तक्रारीवरून वरठी पोलिस व भारतीय सेनेची यंत्रणा १३ दिवसांपासून त्याच्या शोधात होती.बुधवारी सायंकाळी त्याच्या वडिलाला अनोळखी नंबरवरून त्यांचा मुलगा बैतुल जिल्ह्यातील चिंचोली येथे असल्याची माहिती मिळाली.वडिलांनी तात्काळ पोलिस ठाणे गाठून माहिती पोलिसांना दिली.पोलिस निरीक्षक नीलेश गिरी यांनी बैतुल जिल्हा पोलिस प्रशासनाशी संपर्क करून स्थानिक पोलिसांना घटनास्थळावर पाठवले.स्थानिक पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.गुड्डू सिंग यांच्या अंगावर किरकोळ जखमा आहेत.त्याच्या शरीरावर आढळलेल्या जखमा कशामुळे याचा शोध पोलिस घेणार आहेत.मागील १३ दिवस तो कुठे होता हे गुढ कायम आहे.या प्रकरणात वरठी पोलिसांना चौकशी करण्यापासून मज्जाव करण्यात आला असून, सेनादलातील अधिकारी चौकशी करणार आहेत.गायब होण्याचे कारण व त्यामागील उद्देश याचा छडा ही यंत्रणा लावणार आहे.
- Advertisement -

