Friday, September 4, 2026
Homeनागपूरविहिरीतून वाघाची डरकाळी; वाघास जीवनदान..

विहिरीतून वाघाची डरकाळी; वाघास जीवनदान..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-शिकारीच्या शोधात जंगलातून शेतशिवारात भरकटलेला वाघ चक्क विहिरीत पडला असल्याची घटना सावनेर तालुक्यातील सिरोंजी शिवार खापा वनपरिक्षेत्रातील नागलवाडी परिसरात नुकतीच उघडकीस आली.घटनेची माहिती होताच रेस्क्यू टीमने वाघास विहिरीतून सुखरूप बाहेर काढून जीवनदान दिले.
शिवारातील गोवर्धन राऊत यांच्या शेतातील विहिरीत हा वाघ पडला होता.गोवर्धन राऊत पाणी पाजण्यासाठी बैलजोडी घेऊन शेतातील विहिरीजवळ गेले होते.बैलांना पाणी पाजत असताना त्यांना विहिरीतून वाघाची डरकाळी ऐकायला आली.त्यामुळे त्यांनी विहिरीत डोकावून बघितले असता आत वाघ पडला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन आठवले, नागलवाडीचे क्षेत्र सहायक सतीश गडलिंगे,वनरक्षक साहेबराव शेलार यांनी विहिरीची पाहणी केली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह टीटीसीला कळविले.नागपूर शहरातील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरच्या(टीटीसी) रेस्क्यू टीमने लगेच घटनास्थळ गाठून त्या वाघाला विहिरीतून सुखरूप बाहेर काढले.त्यानंतर वाघाला उपचारासाठी नागपूर शहरातील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये नेण्यात आले.विहीर किमान ४५ फूट खोल होती.वाघास बाहेर काढतांना वनाधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!