- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच दोन सदस्यांना अपात्र ठरविले होते.अपात्र ठरविल्याने अपिलाची मुदत संपण्यापूर्वीच कोरपना तालुक्याचे तहसीलदार प्रकाश व्हटकर यांनी नवीन सरपंच निवडीसाठी सभा घेऊन सरपंच निवड केल्याने राज्य शासनाने तहसीलदार प्रकाश व्हटकर यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.सदरचा प्रकार कोरपना तालुक्यातील कढोली खुर्द येथील असून यासंदर्भात उपसरपंच डॉ.विनायक डोहे यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार केली होती.या तक्रारीची राज्य शासनाने दखल घेऊन निलंबनाचा आदेश जारी केला.कढोली खुर्दचे उपसरपंच डॉ.विनायक डोहे यांच्या तक्रारीनुसार ग्रामपंचायत कढोली खुर्दच्या सरपंच निर्मला कवडू मरस्कोल्हे आणि सदस्य सीता पंधरे यांचे सदस्यत्व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार १२ ऑगस्ट २०२४ रोजी अपात्र ठरविण्यात आले होते.या आदेशाविरुद्ध विभागीय आयुक्त,नागपूर यांच्याकडे दाद मागण्यासाठी अर्ज करण्यात आला होता.त्यानुसार २६ ऑगस्ट रोजी नागपूर येथे सुनावणीचे पत्र तहसीलदार प्रकाश व्हटकर यांच्यासह संबंधित सर्वांना देण्यात आले होते.मात्र,तहसीलदार व्हटकर यांनी १९ ऑगस्टला दिलेल्या आदेशानुसार सरपंच निवडीकरिता २६ ऑगस्ट २०२४ रोजी सभा घेतली. काँग्रेस समर्थक उमाजी आत्राम यांची सरपंचपदी निवड केली.अपिलाची मुदत पंधरा दिवस म्हणजे २७ ऑगस्टपर्यंत असताना ती संपायच्या आत ही सभा घेतली.तहसीलदार व्हटकर यांनी एकतर्फी आदेश काढून घाईने सभा घेतल्याने त्यांच्याविरुद्ध तक्रार झाली होती.राज्य सरकारने दखल घेऊन तहसीलदारांवर तात्काळ निलंबनाची कारवाई केली.
- Advertisement -

