Monday, September 7, 2026
Homeभंडारागजबच...! उपसरपंचाने महिला सरपंचांना बनवले तंटामुक्त समिती अध्यक्ष.. - प्रकाराने ग्रामसभेत माजला...

गजबच…! उपसरपंचाने महिला सरपंचांना बनवले तंटामुक्त समिती अध्यक्ष.. – प्रकाराने ग्रामसभेत माजला गदारोळ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-साकोली तालुक्यातील वडद येथे झालेल्या ग्रामसभेत कुणालाही विश्वासात न घेता,कोणताही सुचक अनुमोदक नसताना थेट महिला सरपंचांना तंटामुक्त समिती अध्यक्षपदी विराजमान करण्यात आले.या प्रकाराने आमसभेत गदारोळ माजला. जनतेला न विचारता ग्रामपंचायतमध्ये मनमर्जी कारभार असून याची चौकशी करावी; यासाठी काल,शुक्रवारी साकोली विश्रामगृहात ग्रामस्थांनी पत्रपरिषद घेतली.
पत्रपरिषदेला सुरेश कुंडेजवार,केदार राऊत,चरण मेश्राम,बाळकृष्ण बडवाईक,बाबूलाल सूर्यवंशी आदी उपस्थित होते.ते म्हणाले,आमसभेत तंटामुक्त समिती अध्यक्ष निवड करणे हा एकच विषय होता. यात जनतेने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना सांगितले की,येथील रोजगार सेवक सोविंदा हटवार हे नेहमी अरेरावीची भाषा करून माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष सुरेश कुंडेजवार यांना मानसिक त्रास देऊन शिवीगाळ करतात.त्यांनी अगोदर या ग्राममसभेत कुंडेजवार यांची माफी मागावी,नंतरच नवीन अध्यक्षांची निवड होईल; असे प्रश्न रेटून धरीत गदारोळ केला.
ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच असताना उपसरपंच दीपक कळसकर यांनी कोणताही निर्णय न घेता,रोजगार सेवकाला न बोलविता,सरपंच भारती बडवाईक यांना तंटामुक्त समिती अध्यक्षपदावर विराजमान केले.या निवड प्रक्रियेत कुणीही अनुमोदक दिलेले नसताना सरपंचांना तंटामुक्त समिती अध्यक्षपदी आरूढ करणारे स्वमर्जीचे मालक हे कोण?असा प्रश्न उपस्थित केला.ग्रामदूतमध्येही मनमर्जीने तेही पद आप्तस्वकीयांना देण्याचे षडयंत्र चालविले जात आहे.
भारती बडवाईक,सरपंचा ग्रामपंचायत वडद👇
ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी सुचविल्यानुसार तंटामुक्ती अध्यक्ष पद तात्पुरते स्वीकारले आहे.सरपंच नात्याने गावातील लोकहिताची विकासकामे मार्गी लावण्याचा प्रथमदृष्ट्या प्रयत्न आहे.तंटामुक्ती अध्यक्ष या पदासाठी कोणीही पुढे न आल्याने व इच्छा नसतांनाही या पदावर निवड केली आहे.गावातीलच अन्य सुशिक्षित व शांत स्वभावाच्या व्यक्तीला तंटामुक्ती अध्यक्ष पद देणे गरजेचे असून,त्याकरिता लवकरच पुन्हा ग्रामस्थांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!