Friday, September 4, 2026
Homeब्रम्हपुरीसुरबोडी येथील कर्मवीर कन्नमवार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी खो-खो स्पर्धेत जिल्हा स्तरावर मारली मजल...

सुरबोडी येथील कर्मवीर कन्नमवार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी खो-खो स्पर्धेत जिल्हा स्तरावर मारली मजल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-ब्रम्हपुरीच्या क्रीडा संकुल मैदान या ठिकाणी नुकतीच तालुकास्तरीय विद्यार्थ्यांची सांघिक शालेय बाल क्रीडा पार पडली.त्यामध्ये ब्रम्हपुरी तालुक्याच्या सुरबोडी येथील कर्मवीर कन्नमवार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या १४ वर्षाखालील मुलांनी खो-खो क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवून जिल्हा स्तरावर मजल मारली आहे.
संघाचे क्रीडा प्रशिक्षक तथा शिक्षक माकडे यांनी विद्यार्थ्यांना उत्तमरित्या प्रशिक्षित केल्यामुळे तसेच विद्यार्थ्यांनी उत्तम खेळाचे प्रदर्शन दाखवीत विजय मिळवता आला आहे.शालेय विद्यार्थ्यांनी स्पर्धेत अटीतटीच्या सामन्यात अगदी कमी वेळात खेळाडू बाद करून विजय संपादन केला असल्याने विद्यालयाचे मुख्यध्यापक गांगाधर पिलारे यांनी संपूर्ण खेळाडूंचे त्याचप्रमाणे सर्व मार्गदर्शक गुरुजनांचे  अभिनंदन केले.या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विजयी चमुचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करीत पुढील स्पर्धेसाठी शुभेछ्या दिल्या.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!