- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-गणेशभक्त दर्शन घेत असताना गर्दी व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सभामंडपात हजर असताना एका चोरट्याने दानपेटी पळवली.मात्र, सीसीटीव्ही फुटेजवरून अवघ्या तासांतच ताब्यात घेऊन चोरट्याला वरोरा पोलिसांच्या ताब्यात केले.ही घटना गुरुवारी रात्री १२ वाजता महात्मा गांधी चौकात घडली.प्रशांत वाकुलकर वय ३० वर्षे,रा.खांबाळा असे आरोपीचे नाव आहे.
वरोरा शहरातील महात्मा गांधी चौकात कल्पतरू गणेश मंडळाच्या वतीने गणेशमूर्तीची स्थापना केली जाते.आकर्षक सजावट असलेले देखावे हे मंडळाचे वैशिष्ट्य आहे.देखावे बघण्यासाठी भाविक कल्पतरू गणेश मंडळाजवळ गर्दी करतात.भाविकांना दान देणे सुकर व्हावे; यासाठी सभा मंडपाबाहेर दानपेटी ठेवण्यात आली होती.गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास दानपेटी दिसून आली नाही.त्यामुळे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सभा मंडपातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली.याबाबत गणेश मंडळाचे ज्येष्ठ पदाधिकारी राजेश महाजन व शशिकांत चौधरी यांनी पोलिसांत तक्रार दिली.दरम्यान,सीसीटीव्हीवरून मंडळाच्या पदाधिकारी व नागरिकांनी प्रशांत वाकुलकर याला ताब्यात घेतले.
- Advertisement -

