- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील विविध परिसरात सलग तीन दिवसांपासून जंगली हत्तींनी शेतशिवारातील धानपिकात धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने जंगली हत्तींच्या हैदोसाने शेतकरी बांधव त्रस्त झाले आहेत.नुकतेच वैरागड परिसरातील जंगली हत्तींनी पोर्ला वनपरिक्षेत्रात एन्ट्री केल्याने पिकांचा बचाव करायचा तरी कसा?अशी चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.वैरागड परिसरात हैदोस माजविल्यानंतर जंगली हत्तींचा कळप शुक्रवारी सिर्सी-गणेशपूर शेतशिवारात दाखल झाला.रात्री हत्तींनी तेथील उभ्या धानपिकाची नासधूस केली.त्यानंतर हत्तींनी शनिवारी रात्री पोर्ला वनपरिक्षेत्रातील देलोडा,सूर्यडोंगरी, बोडधा शेतशिवारात शिरून मोठ्या प्रमाणात धानपिकात हैदोस माजवला.यामुळे अनेक शेतकऱ्यांचे जोमात असलेले धानपीक भूईसपाट झालेत.घटनेची माहिती मिळताच वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून नुकसानग्रस्त शेतांची पाहणी केली व पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून नियमानुसार मदत मिळवून देण्यासाठी कार्यवाही केली जाणार आहे.मात्र,धानपिकात धुडगूस घालून मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या जंगली हत्तींचे काय? यावर तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे.जंगली हत्ती इतरत्र भटकंती करून परत शेतातील धानपिकात हैदोस माजवित असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे, जंगली हत्तींचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.
- Advertisement -

