Wednesday, June 24, 2026
Homeनागपूरएकाकी जीवन जगणाऱ्या व्यक्तीने घरीच गळफास घेऊन केली आत्महत्या...

एकाकी जीवन जगणाऱ्या व्यक्तीने घरीच गळफास घेऊन केली आत्महत्या…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-एकाकी जीवन जगणाऱ्या व्यक्तीने घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना सावनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कनियाडोह येथे काल,शुक्रवारी दुपारी उघडकीस आली.राजेंद्र मारुती घोरमाडे वय ४२ वर्षे,रा.कनियाडोल,ता. कळमेश्वर असे मृताचे नाव आहे.
राजेंद्र अविवाहित असून आई व वडिलांच्या निधनानंतर तो घरी एकटाच राहायचा.त्याचा थोरला भाऊ अनिल त्याच्या कुटुंबीयांसह नागपूरला राहतो. तो शुक्रवारी रेशनचे धान्य घेण्यासाठी कनियाडोल येथे गेला होता.धान्य घेतल्यानंतर तो घरी गेला तेव्हा त्याला राजेंद्र छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने दोरीच्या मदतीने गळफास घेऊन घेत आत्महत्या केली होती.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सावनेर शहरातील शासकीय रुग्णालयात नेला.
एकाकीपणामुळे त्याला दारूचे व्यसन जडले होते. त्यातच त्याची मनःस्थिती चांगली राहत नव्हती. त्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी; असा अंदाज अनिल घोरमाडे यांनी व्यक्त केला.याप्रकरणी सावनेर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास संजय शिंदे करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे स्थापन होणार नवीन अप्पर तहसील कार्यालय.. – नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून,याबाबत नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना...

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!