- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-अड्याळ येथील वनपरिक्षेत्राधिकारी घनश्याम ठोंबरे हे वन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून निलंबनाची धमकी देत असल्याची तक्रार दिल्याननंतर उपवनसंरक्षकांनी सखोल चौकशी करीत कारवाई करावी; या मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य वनरक्षक, वनपाल,वन कर्मचारी संघटनेच्या वतीने भंडाऱ्यातील वन कार्यालयात आंदोलन करण्यात आले.आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील व संघटक ललीतकुमार उचिबगले यांनी केले.यावेळी वनपाल वनरक्षक व वन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आंदोलनानंतर डीएफओंशी यावर सविस्तर चर्चाही करण्यात आली.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे अड्याळाचे आरएफओ घनश्याम ठोंबरे हे अड्याळ परिक्षेत्रात रुजू झाल्यापासून त्यांचे वन कर्मचाऱ्यांशी वागणूक असभ्य असल्याचा आरोप आहे.शिवीगाळ करणे,धमकी देणे व निलंबनाची धमकी देत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.१० ऑगस्ट २०२४ ला बिटरक्षक एन.पी.पारधी यांनी घटनेची माहिती देण्यासंदर्भात वनपरिक्षेत्राधिकारी ठोंबरे यांना फोन केला असता, ‘सकाळी फोन का केला,माझी झोपमोड केली,असे बोलून शिवीगाळ केली.तसेच जुने प्रकरण काढून निलंबित करण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे.ठोंबरे हे क्षेत्रातील एक दोन कर्मचाऱ्यांना हाताशी धरून इतर कर्मचाऱ्यांवर दहशत घालून हेतू पुरस्पर वागणूक करीत असल्याचे निवेदनात आरोप करण्यात आला आहे.
क्षेत्र सहाय्यक शामकुवर व इतर वनरक्षकांना ग्रामस्थांच्या समक्ष शिवीगाळ केल्याचे व निलंबित करण्याची धमकी दिल्याचीही तक्रारीत नमूद आहे. यासह अन्य मागण्यांना घेऊन केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील व केंद्रीय संघटक ललितकुमार उचीबगले यांच्या नेतृत्वात उपवनसंरक्षकांना भेट घेत चर्चा करण्यात आली.या सर्व सर्वच प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून त्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
- Advertisement -

