उद्रेक न्युज वृत्त
आरमोरी(गडचिरोली) :- शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आरमोरी विधानसभा क्षेत्रात काल,२७ जुलै रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
उद्धव ठाकरे यांच्या वाढवस दिनाचे औचित्य साधून शिवसेना आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ.रामकृष्ण मडावी यांच्या नेतृत्वात विधानसभा क्षेत्रातील विविध ठिकाणी भर पावसात शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पावसापासून सरंक्षण व्हावे; याकरीता धान रोवणी करणाऱ्या महिलांना घेंघसे,प्लास्टिकचे मेनकापड तसेच फळ वाटप करण्यात आले.त्यानंतर आश्रम शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना फळे आणि बिस्कीटे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे पदाधिकारी रामदास दहिकार,सुनील बांगरे,अक्षय बोरकर,रिंकू झरकर,नरेंद्र निंबेकर,गणेश तिजारे,नरेश हिरापुरे,रेहान शेख,विनोद निमजे,गोलू गायकवाड, आदी निंबोळ,कल्पना तिजारे,विद्या मेश्राम,डिंपल ढोरे, राजू किरमे तसेच स्थानिक ग्रामस्थ बांधव,महिला भगिनी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

