Wednesday, August 26, 2026
Homeआरमोरीवडधा येथील आरोग्य शिबिरात १५९३ रुग्णांनी घेतला लाभ...रामदास मसराम व मित्र परिवारांनी...

वडधा येथील आरोग्य शिबिरात १५९३ रुग्णांनी घेतला लाभ…रामदास मसराम व मित्र परिवारांनी आरमोरी तालुक्यात आयोजित केला शिबिर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

आरमोरी(गडचिरोली) :-हल्ली शेतीचा हंगाम सुरु असून शेतकरी बांधव शेतात रात्रंदिवस काम करीत असतात.असे असूनही अनेकांना आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.अशातच शेतात मशागतीचे दिवस सुरू असताना गोरगरिब लोकांना आरोग्याची समस्या निर्माण होऊ नये; यासाठी आरमोरी विधानसभा क्षेत्रात शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर, प्रयत्नशील असलेले शेतकरी आंदोलनाचे नेते रामदास मसराम यांनी वडधा येथे मोफत आरोग्य तपासणी, मोफत औषधी वाटप,नेत्र उपचार,मोफत चष्मे वाटप व सामान्य रोगांची तपासणी  शिबिराचे आयोजन केले होते.त्यानुसार आरमोरी तालुक्यातील वडधा येथे काँग्रेसचे नेते रामदास मसराम व मित्र परिवाराने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य  शिबिरात १५९३ रुग्णांनी तपासणी करून आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.यामध्ये वडधा,बोरी,डार्लिं, बोडधा चक,देलोडा खुर्द,देलोडा बु.,देविपुर,देशपुर, कुरांझा,टेंभा चक,नरोटी माल,नरोटी चक या भागातील शेतकरी,आबाल वृध्द,महिला-पुरुष मंडळी व इतर यांनी सहभाग नोंदविला होता.

शिबिरात ४८६ रुग्णांची नेत्र तपासणी करून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.९८३ रुग्णांची सामान्य तपासणी करून त्यांना मोफत औषधी वितरण करण्यात आली.१०२ रुग्णांची मधुमेह तपासणी करून त्यांना औषधोपचार पुरविण्यात आला.हृदय रोगाच्या रुग्णांची तपासणी करून १२ रुग्णांना मोफत औषधोपचार तथा पुढिल आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे मार्गदर्शन तसेच १२ मोतीबिंदु रुग्णांची तपासणी करून त्यांच्या शस्त्रक्रियेची पुढील व्यवस्थेचे मार्गदर्शन केले व ३८ रुग्णाची इसिजी,३६ एल एस स्पाईन, तर ४ रुग्ण मुत्र खड्याचे तपासण्यात आले.याप्रसंगी कॉंग्रेसचे पदाधिकारी भूपेश कोलते यांचेसह १४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. 

आरोग्य शिबिराचे आयोजक रामदास मसराम काँग्रेस नेते यांचे सह माजी पं.स.सभापती परसराम टिकले, प्रियाताई गेडाम सरपंच ग्रामपंचायत वडधा,वनिताताई सहाकाटे माजी जी.प.सदस्य गडचिरोली,तुलाराम गेडाम माजी सभापती पंचायत समिती आरमोरी, डंबाजी हुलके सरपंच ग्रामपंचायत देलोडा,रमेश कोलते तमुस अध्यक्ष वडधा,भूपेश कोलते ओबीसी जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली,अरविंद फटाले देलोडा, डाकराव बांगरे तमुसअध्यक्ष देलोडा, विश्वेश्वर दर्रॉ,सरपंच ग्रामपंचायत शिरशी,देवराव कोडाप माजी सदस्य पंचायत समिती आरमोरी,सुखदेव रामटेके, लक्ष्मण झरकर तंमुस अध्यक्ष देलोडा,श्रीकांत भजभुजे वडधा,मोरू पा.लाकडे,केवळ गेडाम ग्रा.पं.देलोडा व इतर मान्यवर उपस्थित होते. 

आरोग्य शिबिराला नागपूरच्या सुप्रसिद्ध असलेल्या श्युअरटेक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटच्या तज्ञ डॉक्टरांच्या चमुसह जिल्हा रुग्णालय गडचिरोलीचे तज्ञ डॉक्टर,आरोग्य कर्मचारी तसेच देसाईगंजच्या ग्रामिण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी सेवा प्रदान केली. यशस्वितेसाठी सागर वाढई,जावेद शेख,स्वप्नील मिसार,मोरू मोहूर्ले,शैलेश येलगंदवार,राजू कुरेशी, लंकेश ढोरे,उमाकांत दोनाडकर,रेशीम प्रधान, भोलानाथ कोलते,श्रीकांत भजबुजे,तुषार सेलोटे, यशवंत चुधरी,उत्तम भजभुजे,रवींद्र गंडाते यांचेसह युवा कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!