उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :-जिल्हा स्तरावरील वा तालुका स्तरावरील विविध समित्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता,गोर-गरीब व इतर नागरिकांच्या समस्या,प्रलंबित प्रकरणे तसेच प्राप्त तक्रारींची सोडवून करण्यासाठी आणि शासकीय कामकाज लवकरात-लवकर व्हावे; यासाठी नामनिर्देशित करून अशासकीय विविध समित्या गठीत करण्यात येतात. मागील काही वर्षांपासून शासकीय स्तरावरील समित्या काही कारणास्तव गठीत करण्यात आल्या नव्हत्या.अशातच आता नुकत्याच गडचिरोली जिल्ह्यातील विविध अशासकीय समित्या गठित करण्यात आल्या आहेत.त्यानुसार नुकतीच देसाईगंज तालुका स्तरीय दक्षता समिती गठीत करण्यात आली आहे.सदर देसाईगंज तालुका स्तरीय दक्षता समितीच्या अध्यक्षपदी सचिन वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सदरची नियुक्ती गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी केली.याबाबतचे नियुक्ती आदेश गडचिरोली जिल्हाधिकारी यांनी नुकतेच दिले आहे. तालुका स्तरीय दक्षता समितीच्या माध्यमातून तालुक्यातील संपूर्ण समित्यांचा आढावा घेणे,देखरेख ठेवणे,प्रलंबित प्रकरणांचा त्वरित निपटारा करणे व इतर विविध कार्ये पार पाडण्यात येणार आहेत.
सचिन वानखेडे यांची देसाईगंज तालुका स्तरीय दक्षता समिती अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने,नियुक्तीचे श्रेय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस,आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे,गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,गडचिरोली-चिमूर लोकसभा प्रमुख किसन नागदेवे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल तिडके,देसाईगंज तालुकाध्यक्ष सुनिल पारधी (ग्रामीण), देसाईगंज शहराध्यक्ष सचिन खरकाटे,जिल्हा महामंत्री सदानंद कुथे,माजी नगराध्यक्ष शालुलाई दंडवते,माजी नगरसेवक राजु जेठानी यांना दिले आहे.

