Wednesday, August 26, 2026
Homeआरमोरीवडधा गावातील मुख्य मार्गावर गतिरोधक बसविण्याची मागणी…-मार्गावरून सुसाट वाहनांची रेलचेल..

वडधा गावातील मुख्य मार्गावर गतिरोधक बसविण्याची मागणी…-मार्गावरून सुसाट वाहनांची रेलचेल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

आरमोरी(गडचिरोली) :- आरमोरी तालुका मुख्यालयापासून २५ किलोमिटर अंतरावर असलेल्या  वडधा गावातील,गावातून जाणाऱ्या मुख्य डांबरीकरण मार्गावर गतिरोधक(स्पीड ब्रेकर) अभावी दररोज सुसाट वेगाने जाणाऱ्या वाहनांची रेलचेल वाढतच चालली आहे.अशातच यावर आवर घालणार कोण? असा सवाल अनेकांकडून उपस्थित केला जातो आहे.गावातील मुख्य मार्गावरून दुचाकी,चारचाकी व इतर अवजड वाहने सुसाट वेगाने पळवित असल्याने दिवसेंदिवस अपघात होण्याचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे.यावर कुठेतरी आळा घातला जावा; यासाठी मुख्य मार्गावर गतिरोधक बसविण्याची मागणी गावातील सुजाण नागरिकांनी केली आहे.

आरमोरी तालुक्यातील वडधा गाव हे आजूबाजूच्या परिसरातील गावांना लागून मधोमध वसले आहे. गावातून मधोमध एक किलोमिटर अंतरापर्यंत मुख्य डांबरीकरण मार्ग आहे.मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजूस वस्ती,किराणा दुकान,फळविक्रेते,भाजीपाला विक्रेते व इतर व्यावसायिक दुकाने वसलेली आहेत.रस्ता अरुंद आहे.अशातही अवजड वाहने तसेच इतर वाहने रस्त्याच्या कडेला उभी राहत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होऊन नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे.त्यात आणखी भर पडून सुसाट वेगाने वाहने जात असल्याने रस्ता ओलांडताना गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन वाट शोधावी लागत असते.याच मार्गावर अनेकदा किरकोळ तसेच गंभीर अपघात झालेले आहेत.मागील तीन वर्षांपूर्वी गावातील ४ वर्षीय श्रवन सुधीर कुर्वे मुलाचा अपघाती मृत्यू झाला होता.श्रवन रस्त्याच्या कडेला उभा असताना,सुसाट वेगाने जाणाऱ्या वाहनाने धडक देऊन जागीच ठार केले होते.रस्ता अरुंद असल्याने सुसाट वेगाने जाणाऱ्या वाहनांवार कुठेतरी लगाम घालण्यासाठी तसेच अपघात होण्याचे अनुचित प्रकार घडू नयेत; यासाठी मुख्य मार्गावर गतिरोध आवश्यक आहे. त्यामुळे ग्राम स्तरावरून वा संबंधित विभागाने गतिरोधक(स्पीड ब्रेकर) बसविण्यात यावा; अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!