Friday, August 7, 2026
Homeचंद्रपूरकार-दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार..-अपघातात दुचाकीने घेतला पेट…आजची घटना

कार-दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार..-अपघातात दुचाकीने घेतला पेट…आजची घटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- चिमूर-कांम्पा महामार्गावरील शंकरपूर जवळील डोमा फाट्यावर कार व दुचाकीमध्ये झालेल्या भीषण झाला.अपघातात दुचाकीस्वार पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली.सदरची घटना आज दिनांक -१३ मे रोजी दुपारी १२ च्या सुमारास घडली.श्रावण बापूराव गुरनुले वय ४० वर्षे असे मृत पतीचे नाव आहे.

श्रावण गुरनुले हे चिमुर तालुक्यातील डोमा येथील रहिवासी आहेत.ते आज पत्नी कल्पना यांच्यासोबत लावारी जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी दुचाकीवरून गेले होते.तेंदूपत्ता घेऊन गावी परत येत असताना चिमूर-कान्पा मार्गावरील डोमा फाट्यावर शंकरपूरकडे जाणाऱ्या कारची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली.या अपघातात श्रावण गुरूनुले यांचा जागीच मृत्यू झाला.अपघात इतका भीषण होता की,घटनास्थळी दुचाकीने लगेच पेट घेतला.व दुचाकी काही क्षणात जळून खाक झाली.त्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या तेंदूपत्ता मजुरांनी कल्पना यांना जखमी अवस्थेत शंकरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले.तेथून त्यांना चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले.तसेच श्रावण गुरनुले यांचा मृतदेह चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.अपघातानंतर पोलिसांनी कारचालकाला शंकरपूर येथील बस स्थानकाजवळ अडवून कार जप्त केली.व त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

गडचिरोली जिल्ह्यात अग्निवीर भरतीसाठी तब्बल सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारतीय सैन्यातील अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींना सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे,यासाठी गडचिरोली जिल्ह्यात येत्या,सोमवार १० ते १२ ऑगस्ट २०२६...

सात हजाराची लाच भोवली; महिला ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत तब्बल सात हजाराची लाच घेतांना एका महिला ग्रामसेविकेस रंगेहाथ पकडले.रंजू...

राज्यातील ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटींच्या कर्जमुक्ती लाभाचे वितरण.. – आज गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांसाठी बँकांना रक्कम...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांसाठी १५ कोटी १८ लाख ७२ हजार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!