उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्यातील रब्बी हंगामाची धान मळणी सुरु झाली असुन व्यापारी वर्गांकडून शेतकऱ्यांचे धान कमी भावात खरेदी केल्या जात असल्याने शेतकऱ्यांची सर्रास लुट सुरु आहे.शेतकरी वर्गांची होणारी लुट थांबविण्यासाठी शासनाने तात्काळ हमीभाव धान खरेदी केन्द्र सुरु करावे; अशी मागणी शेतकरी नेते तथा कॉंग्रेसचे कार्यकर्ते रामदास मसराम यांनी केली देसाईगंज तालुक्यात इटियाडोह प्रकल्पाच्या माध्यमातुन सिंचनाची सोय तसेच मोटार पंपाच्या माध्यमातुन रब्बी धान पिकाची लागवड आरमोरी, कुरखेडा,कोरची तालुक्यात मोठ्या प्रमाणात करण्यात आली.विद्युत पुरवठ्याची सोय व्हावी; यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन थकित बिलाचा भरणा केला. कुरखेडा,कोरची तालुक्यात अपुऱ्या विज पुरवठ्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे धान पिक धोक्यात आले.असे असतांना सद्या धानाची मळणी सुरु होऊनही अद्याप शासनाने हमीभाव खरेदी केन्द्रे सुरु केली नसल्याने धान्य व्यापारी शेतकऱ्यांचे धान कमी भावाने खरेदी करीत असल्याने शेतकरी वर्गांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुट सुरु आहे.शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु केली असली तरी खरीप हंगामाचे खरेदी केलेले धान अद्यापही गोदामातच पडलेले आहे.उचल न झाल्याने नविन खरेदी चा धान साठवायचा कुठे? हा प्रश्न खरेदी केन्द्र संचालकांना पडला असुन ऑनलाईन नोंदणीचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही.या समेस्येवर लवकरात-लवकर तोडगा काढुन लवकरात-लवकर हमीभाव धान खरेदी केन्द्रे सुरु करुन देसाईगंज, कुरखेडा,आरमोरी,कोरची या तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थीक लुट थांबवावी; अशी मागणी रामदास मसराम यांनी केली आहे.

