Friday, August 7, 2026
Homeमुंबईघाटकोपरमध्ये जाहिरातीचे होर्डिंग कोसळून ८ जणांचा मृत्यू तर ६९ जण जखमी..

घाटकोपरमध्ये जाहिरातीचे होर्डिंग कोसळून ८ जणांचा मृत्यू तर ६९ जण जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :- घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू तर ६९ जण जखमी झाले आहेत.तर ४७ जणांना रेस्क्यू करण्यात आले.जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहे.अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्या कंपनीविरोधात मुंबई महानगर पालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. पालिकेने होर्डिंग लावणाऱ्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळावर सध्या मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी फोनवर चर्चा करून होर्डिंग दुर्घटनेची माहीती घेतली.

घाटकोपरच्या इस्टर्न एक्स्प्रेस हायवेलगत पोलिस ग्राऊंडच्या शेजारी असलेल्या पेट्रोल पंपावर दुपारी साडेचारच्या सुमारास अचानक होर्डिंग कोसळले.मुंबईत आज तुफान वादळ वारा तसेच मुसळधार पाऊस सुरू होता.त्यामुळे वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे हे होर्डिंग कोसळले.हे होर्डिंग अनधिकृत होते.या अनधिकृत होर्डिंगप्रकरणी कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पालिकेकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई महानगर पालिकेकडून फक्त ४० फूटांचे होर्डिंग लावण्याची परवानगी देण्यात आली आहे.तरी देखील हे १२० फूटांचे होर्डिंग लावलेच कसे? असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारला आहे. होर्डिंग लावणाऱ्याला यापूर्वीच पालिकेने नोटीस पाठवली होती.घटनास्थळावर बचवकार्यासाठी एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे.आतापर्यंत ४७ जणांना बाहेर काढण्यात आले आहे.जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी होर्डिंग कोसळल्याच्या

प्रकरणाची दखल घेतली आहे. जखमींवर तातडीने उपचार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.  सर्व होर्डिंगचे सर्वेक्षण करून लायसन्स नसणाऱ्यांविरोधात कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.तसेच मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना ५ लाखाची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

गडचिरोली जिल्ह्यात अग्निवीर भरतीसाठी तब्बल सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारतीय सैन्यातील अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींना सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे,यासाठी गडचिरोली जिल्ह्यात येत्या,सोमवार १० ते १२ ऑगस्ट २०२६...

सात हजाराची लाच भोवली; महिला ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत तब्बल सात हजाराची लाच घेतांना एका महिला ग्रामसेविकेस रंगेहाथ पकडले.रंजू...

राज्यातील ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटींच्या कर्जमुक्ती लाभाचे वितरण.. – आज गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांसाठी बँकांना रक्कम...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांसाठी १५ कोटी १८ लाख ७२ हजार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!