Monday, September 21, 2026
Homeभंडाराप्रेम प्रकरणातून २४ वर्षीय युवकाने महिलेवर केला हल्ला…..

प्रेम प्रकरणातून २४ वर्षीय युवकाने महिलेवर केला हल्ला…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा(तुमसर) :- प्रेमाचे वय ठरलेले नसते; कधी कुणावर प्रेम होणार हे सांगता येणार नाही.मुलगा वा मुलगी कितीही मोठे झाले तरीही आई-वडिलांसाठी ते लहानच असतात.मात्र हल्ली प्रेमाची परिभाषा तसेच प्रेम करणे अवघड झाल्याचे दिसून येत आहे.कारण की आपण ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतोय; अशा व्यक्तींना दुखापत वा जराशीही इजा झाल्यास मन व काळीज फाटल्या सारखे होते.मात्र हल्ली वेगळेच दिसून येत आहे.असाच प्रकार हल्ली निदर्शनास आला आहे.

‘तू माझ्याशी बोलत का नाही, तुझे म्हणणे काय आहे’, या कारणावरून घरात शिरून महिलेवर व तिच्या अल्पवयीन मुलीवर विश्वास चंद्रिकापुरे याने हल्ला केल्याची बाब उघडकीला आली आहे.या हल्ल्याप्रकरणी विश्वासला शनिवारी अटक करण्यात आली.प्रेम प्रकरणातून चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास शहरातील दुर्गानगर येथे घडली होती.दाखल तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.काल,शनिवारी विश्वास सुरेंद्र चंद्रिकापुरे वय २४ वर्षे याला अटक करीत न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले.न्यायालयाने ४ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.घरात बसलेल्या महिलेवर व तिच्या अल्पवयीन मुलीवर विश्वासने पॅन्टच्या  खिशातून चाकू काढून अल्पवयीन मुलीवर मारण्यास धावला.मुलीच्या आईने प्रतिकार केला असता तिच्या गळ्यावर चाकू मारुन गंभीर जखमी केले. मुलगी भीतीने घरासमोर पळाली असता विश्वास हा तिच्या मागे धावून शेजारच्या घरी जाऊन मुलीच्या डाव्या पायाला चाकू मारून जखमी केले.त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!