- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील सास्ती येथील एका विवाहित महिलेने घरगुती वादातून नदीत उडी मारून आत्महत्या केल्याने कुटुंबिय शोकसागरात बुडाले आहे.शीतल प्रशांत मुळे वय ३८ वर्षे,रा.सम्राट चौक, बालाजी वॉर्ड,बल्लारपूर,जि.चंद्रपूर असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव असून मागील काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये खटके उडू लागल्याने शीतल ही सास्ती येथील आई-वडिलांकडे वास्तव्यास होती.विशेष म्हणजे,पाच वर्षांपूर्वी शितल ही आपल्या पहिल्या पतीपासून विभक्त होऊन तिने बल्लापुरातील प्रशांत मुळे याच्यासोबत विवाह केला होता.अश्यातच पतीसोबत होणाऱ्या वादामुळे ती माहेरी निघून गेली होती.दरम्यान,दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २० मार्च रोजी रात्रीच्या सुमारास कुणाला काहीही न सांगता ती घराबाहेर पडली होती.बराच उशीर होऊनही शीतल ही घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.प्रकरणी पोलिसांनी परिसरातील माहितीच्या आधारे शोध घेत तपास सुरू केला.या दरम्यान,गावाजवळील वर्धा नदी परिसरात पाहणी केली असता काल शनिवारी दुपारच्या सुमारास शीतलचा मृतदेह नदी पत्रातील पाण्यावर तरंगताना दिसून आला. लगेच मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पोलिसांनी पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला.एका विवाहित महिलेने केवळ घरगुती वादामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
- Advertisement -

