Monday, August 31, 2026
Homeभंडारामावशीकडे स्वेटर आणायला गेले अन् घात झाला; दोन आयटीआयच्या विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू..

मावशीकडे स्वेटर आणायला गेले अन् घात झाला; दोन आयटीआयच्या विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथील दोन जिवलग मित्रांचा दुचाकी-ट्रॅक्टर अपघातात घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना काल शुक्रवारी सकाळच्या सुमारास गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील विरशी फाट्यानजीक तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर घडली.अपघातात १९ वर्षीय यश राजेश उईके व १८ वर्षीय भारत भगवान बनकर या दोन जिवलग मित्रांचा मृत्यू झाला.दोघेही भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथील रहिवासी होते,तर तुमसर येथील सातपुडा आयटीआयचे(औद्योगिक प्रशिक्षण संस्था)विद्यार्थी होते.
माहितीनुसार,यश व त्याचा जीवलग मित्र भारत हे दोघेही काल शुक्रवारी सकाळच्या सुमारास एमएच३६ एपी ६४५४ क्रमांकाच्या दुचाकीने त्यांच्या स्वगावाहून  दवनीवाडा येथील मावशीकडे यशचे स्वेटर आणण्यासाठी निघाले होते.दरम्यान विरशी फाट्याजवळ दुसऱ्या साईडने येणाऱ्या ट्रॅक्टरला दुचाकी वाहन आपटले.यात दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. महत्वाचे म्हणजे,काल शुक्रवारी दोघेही मित्र उज्जैन येथील महाकालच्या देव दर्शनासाठी जाणार होते.तत्पूर्वी मावशीकडे विसरलेले स्वेटर आणण्यासाठी गेले असता दोन्ही जिवलग मित्रांवर काळाने झडप घालून कुटुंबियांवर मोठा आघात केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!