Wednesday, September 9, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तभारतरत्न आणि पद्मश्री पुरस्कार ही पदवी नाही; त्यामुळे नावा समोर वा मागे...

भारतरत्न आणि पद्मश्री पुरस्कार ही पदवी नाही; त्यामुळे नावा समोर वा मागे लावता येणार नाही.. – उच्च न्यायालय..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-देशातील त्याचबरोबर विविध  राज्यातील अनेक मान्यवर,सामाजिक कार्यकर्ते व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांचे नागरी सन्मान म्हणून भारतरत्न,पद्मश्री,पद्मभूषण, पद्मविभूषण यांसारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात येते.मात्र,देण्यात येणारे नागरी सन्मान ही पदवी नसल्याने नावा समोर वा नावाच्या मागे लावता येणार नाही; असे मत मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकेच्या केस टायटलमध्ये ‘पद्मश्री’ असे लिहिण्यात आल्याने व्यक्त केले.न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसन यांचे खंडपीठ याचिकेची सुनावणी घेत होते.यामध्ये २००४ मध्ये पद्मश्रीने सन्मानित डॉ.शरद मोरेश्वर हार्डिकर हे देखील एक पक्षकार होते.केस टायटलमध्ये त्यांचे नाव ‘पद्मश्री डॉ.शरद मोरेश्वर हार्डिकर’असे लिहिले होते.यावर न्यायाधीशांनी आक्षेप घेतला आणि उच्च न्यायालयाने १९९५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या संविधान पीठाच्या निर्णयाचा उल्लेख केला.त्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले होते की,पद्म पुरस्कार आणि भारतरत्न या पदव्या नाहीत आणि त्यांचा नावापुढे किंवा मागे वापर करू नये.असे करणे कायद्यानुसार चुकीचे असल्याचे म्हटले. न्यायमूर्ती सुंदरेशन म्हणाले की,सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय संविधानाच्या अनुच्छेद १४१ नुसार सर्वांना लागू होतो.याचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.त्यांनी निर्देश दिले की पुढील कायदेशीर कार्यवाहीमध्ये सर्व पक्ष आणि न्यायालयांनी या नियमाचे पालन करावे.देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांमध्ये समाविष्ट असलेले पद्म पुरस्कार तीन श्रेणींमध्ये प्रदान केले जातात.यात पद्मश्री,पद्मभूषण आणि पद्मविभूषण  हे पुरस्कार कला,समाजसेवा,विज्ञान,अभियांत्रिकी, व्यवसाय,उद्योग,वैद्यकीय,साहित्य,शिक्षण,खेळ आणि नागरी सेवा यांसारख्या विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कार्यासाठी दिले जातात.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांचा गडचिरोली दौरा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे उद्या,गुरुवार १० सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा...

कुलरमध्ये पाणी भरणे जीवावर बेतले; एकाचवेळी दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-कित्येकदा कुलर सुरू असतांना वा कुलरची बोर्डमध्ये लावलेली पिन न काढता कुलरमध्ये पाणी भरणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.बऱ्याच नागरिकांना कुलरच्या विद्युत प्रवाहाचा...

ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका.. – आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील उपक्रमाचे कौतुक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली...

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!