- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-राज्य शासनाने जेव्हापासून महिलांसाठी बसची अर्धी तिकीट केली,तेव्हापासून बसमध्ये पुरुषांची संख्या कमी तर महिलांचीच तोबा गर्दी पहावयास मिळते आहे.अश्यातच कित्येक बस प्रवाशांनी खचाखच भरलेली असतांनाही अनेकजण बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत असतात.अश्याच प्रकारे दोन दिवसांपूर्वी ८ सप्टेंबरला बसमध्ये तोबा गर्दी असतांनाही प्रवाशांना आत बसविण्याच्या नादात बसच्या कंडक्टर म्हणजेच वाहकाचा हात एका १८ वर्षीय तरुणीला लागला अन् जो गोंधळ उडाला की,प्रवाशांनी भरलेली बस थेट पोलिस ठाण्यातच न्यावी लागली.तरुणी ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने अखेर पोलिसांनी मध्यस्थी करीत प्रकरण शांत केले.
याबाबत अधिक माहिती अशी की,भंडारा जिल्ह्याच्या साकोली आगाराची बस साकोली-बोळदे फेरीसाठी सज्ज होती.सदरची बस शाळेतील विद्यार्थी तसेच प्रवाशांनी खचाखच भरली होती.अश्यातच बसचा कंडक्टर आत चढून प्रवाशांना मागील बाजूस सरका म्हणत असतांनाच चुकून न कळत तरुणीला कंडक्टरचा हात लागला. तितक्यात तरुणी जो भडकली तो थांबण्याचे नावच घेत नव्हती.इतर प्रवाशी समजविण्याचा प्रयत्न करू लागले, पण ती ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने अखेर रात्रीच्या सुमारास प्रवाशांनी भरलेली बस साकोली पोलीस ठाण्यात न्यावी लागली.प्रकरणी पोलिसांनी बसमधील प्रवाशांना विचारपूस केली असता कंडक्टरची चूक नसल्याचे सांगितल्याने तरुणी शांत झाली.एकतर बस प्रवाशांनी खचाखच भरली होती.त्यातच चुकीने हात लागला असेल म्हणून समजदारी घेतल्याने विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकता-अडकता बस कंडक्टर थोडक्यात बचावला.
- Advertisement -

