Thursday, May 28, 2026
Homeचंद्रपूरशेतशिवारातील परिसरात मृतावस्थेत आढळला बिबट्या..

शेतशिवारातील परिसरात मृतावस्थेत आढळला बिबट्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली वन परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या टेकाडी गावनजीकच्या शेतशिवारातील परिसरात नऊ महिन्याच्या बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळून आल्याने वन विभागात एकच खळबळ उडाली.विशेष म्हणजे,काही दिवसांपूर्वी याच परिसरातील पोल्ट्रीफॉर्मवर हल्ला करून १३५ कोंबड्यांना मारणाऱ्या एका मादी बिबट्याला त्याच ठिकाणी वनविभागाने जेरबंद केले होते.टेकाडी येथील सुनील गेडाम यांच्या शेतातील गट क्रमांक ३५३ मधील परिसरात एका झुडपात बिबट्या असल्याची माहिती वनविभागाला मिळाली.त्यानुसार अतिशिघ्र कृती दलाचे पथक व संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले.बिबट्याला बेशुद्ध करून सुरक्षितपणे पकडण्याची तयारी सुरू केली.मात्र,पाहणी करीत असतांना हा बिबट मृतावस्थेत असल्याचे निदर्शनास आले.त्यानुसार मृत बिबट्याला सावली वनपरिक्षेत्र कार्यालयात नेण्यात आले.पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.कुंदन पोडचलवार यांनी शवविच्छेदन केले.बिबट्याचा शेतातील पिकांवरील कीटकनाशक फवारणीच्या विषबाधेने मृत्यू झाला असावा,अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा शेतशिवारात आढळला मृतदेह.. – वाघाच्या अफवेने वनविभागासह पोलिस यंत्रणेची मोठी धावपळ..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-घरच्यांना दवाखान्यात जात असल्याचे सांगून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा चक्क शेतशिवारात मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.पण,मृतदेहावरील खुणा पाहून...

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

अजब-गजब कारनामा..! वसतिगृहात कुलरची मागणी केली म्हणून विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या विदर्भात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. यामुळे जीवाची लाही-लाही होत आहे.प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.त्यातच,पंखे व इतर हवेच्या साधनांनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!