Wednesday, July 15, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसर्वसामान्यांसाठी पैश्याची बरसात; आता लाडक्या बहिणींचेही दीड हजार रुपये येणार खात्यात..!

सर्वसामान्यांसाठी पैश्याची बरसात; आता लाडक्या बहिणींचेही दीड हजार रुपये येणार खात्यात..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येताच गोर-गरिबांसह सर्वसामान्यांसाठी जणूकाही पैश्यांची बरसातच होऊ लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार,शेतकऱ्यांसाठी दोन हजार,निराधार,अपंगांसाठी पुढच्या महिन्यापासून अडीच हजार रुपये,शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस, नुकसानभरपाई व इतर अनेक योजनांच्या माध्यमातून पैश्यांचा ‘खेला हॉबे’ सुरू झालाय.सरकार सर्वसामान्यांच्याच खिशालाच चुना लावते,हे तुम्हालाही माहीत आहे.पण,गोर-गरिबांच्या अडीअडचणीच्या काळात सरकारच कामात पडू लागली आहे.हेही तितकेच खरे.काल मंगळवारी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करण्यात आले.अश्यातच
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी जुलै महिन्याचे दीड हजार रुपये रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ८ ऑगस्ट रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले होते.त्यातच ऑगस्ट महिन्याचे दीड हजार रुपये आणि सध्या सुरू असलेल्या सप्टेंबर महिन्याचे दीड हजार रुपये असे दोन्ही महिन्यांचे लाभ एकत्रित वितरीत करण्यात येणार,अशी अपेक्षा होती.मात्र,शासनाने आता मागील  ऑगस्ट महिन्याचा निधी स्वतंत्रपणे जारी केला आहे. त्यानुसार राज्य शासनाने सामाजिक न्याय विभागाकडून ३४४ कोटी रुपये लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा लाभ अदा करण्यासाठी  वितरित केला आहे.त्यामुळे राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा लाभ लवकरच खात्यात जमा करण्यात येणार आहे.याबाबत महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे लवकरच घोषणा करणार आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता राज्यभरातील धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने निघणार निकाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स ॲक्ट,१८८१ च्या...

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!