Tuesday, July 7, 2026
Homeभंडाराज्या झाडाला लटकून मोठ्या भावाने आत्महत्या केली; त्याच झाडाला लटकून लहान भावानेही...

ज्या झाडाला लटकून मोठ्या भावाने आत्महत्या केली; त्याच झाडाला लटकून लहान भावानेही जीवनयात्रा संपवली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.तब्बल सात ते आठ वर्षांपूर्वी शेतातील ज्या मोहाच्या झाडाला लटकून म्हणजेच गळफास घेऊन मोठ्या भावाने आत्महत्या केली होती; त्याच मोहाच्या झाडाला लटकून लहान भावानेही जीवनयात्रा संपविल्याने घटनेने ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीती पसरली आहे.सदरची घटना लाखनी तालुक्यातील इसापूर गावात १५ मे २०२६ रोजी उघडकीस आली.आकाश श्रीराम गिदमारे वय २८ वर्षे, रा.इसापूर,ता.लाखनी,जि.भंडारा असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो अविवाहित होता.विशेष म्हणजे,श्रीराम गिदमारे यांचा पुतण्या सकाळच्या सुमारास शेतावर गेला असता,सदरची घटना उघड झाली.मृतक आकाश हा शेतातील मोहाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला.फाशी लागला-फाशी लागला,अशी चर्चा रंगताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेत बघ्यांची मोठी जमली.दरम्यान, पूर्वी घडलेल्या घटनेने उजाडा दिला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. विशेष म्हणजे,मोठा भाऊ आणि लहान भावाने एकाच झाडाला तेही गळफासच घेऊन आत्महत्या केल्याने ग्रामस्थ हादरले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर होणार कमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये अद्याप सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला आहे; विशेषतः खानदेश(धुळे...

येत्या शुक्रवारी आरमोरीत रोजगार मेळाव्याचे आयोजन; ५६० रिक्त पदांसाठी राबविण्यात येणार भरती प्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र(मॉडेल करिअर सेंटर), गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,शुक्रवार १० जुलै...

सिरोंचा-आलापल्ली मार्ग तीन महिन्यांहून अधिक काळासाठी जडवाहतुकीसाठी बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३-सी वरील सिरोंचा-आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड...

कार अपघातातील विमा नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यरत असून त्याद्वारे ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यात येते.याबाबत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!