Thursday, August 27, 2026
Homeआरमोरीचक्क ग्रामपंचायत कार्यालयासमोरच दुर्गंधीयुक्त चिखलाचे साम्राज्य.. - कोजबी ग्रामपंचायत प्रशासन निद्रावस्थेत..

चक्क ग्रामपंचायत कार्यालयासमोरच दुर्गंधीयुक्त चिखलाचे साम्राज्य.. – कोजबी ग्रामपंचायत प्रशासन निद्रावस्थेत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी तालुक्याच्या कोजबी ग्रामपंचायत कार्यालयासमोरच चक्क दुर्गंधीयुक्त चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.अश्यातच गावातील जिल्हा परिषद शाळे समोरही हिच अवस्था असल्याने गावातील नागरिकांसह विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असतांना नजरेसमोर दिसूनही न दिसल्यासारखे केले जात असल्याने ग्रामपंचायत प्रशासन निद्रावस्थेत गेले की काय? अश्या संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यां उमटू लागल्या आहेत.दुर्गंधीयुक्त चिखलाच्या साम्राज्याने ग्रामस्थांचे तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गावातील प्रमुख प्रशासकीय इमारतींसमोरच हा चिखल साचलेला असून,पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे.या चिखलातून विद्यार्थ्यांना शाळेत जातांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.चिखलातून वाट काढावी लागत असल्याने या ठिकाणाहून अनेकदा पाय घसरून अपघाताच्या घटना घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे,ग्रामपंचायत कार्यालयासमोरच ही परिस्थिती असतांनाही प्रशासन डोळेझाक करत आहे.स्वच्छता,रस्त्यांची दुरुस्ती आणि पाणी निचरा ही ग्रामपंचायतची जबाबदारी असतांना यावर कोणतीही ठोस उपाययोजना अद्याप झालेली नाही.यावरून ग्रामपंचायतीचा हलगर्जीपणा स्पष्टपणे दिसून येतो.स्थानिक नागरिकांनी या समस्येवर अनेकदा तक्रारी दाखल केल्या,निवेदने दिली,परंतु परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही.शाळेतील विद्यार्थी आणि पालकांमध्ये या ठिकाणी असलेल्या अस्वच्छतेमुळे असंतोषाचे वातावरण पसरले आहे.चिखलामुळे एखादे वाहन स्लीप होऊन मोठा अपघात घडल्यासच प्रशासनाला जाग येईल कां?असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.ग्रामपंचायतीने यावर तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करू,असा इशारा ग्रामस्थांनी दिला असल्याने ग्रामपंचायत प्रशासन ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!