Saturday, July 11, 2026
Homeदेसाईगंजकोंढाळा रेती घाटातून रात्रीच्या सुमारास सुरू झालाय अवैध रेतीचा खेळ..!

कोंढाळा रेती घाटातून रात्रीच्या सुमारास सुरू झालाय अवैध रेतीचा खेळ..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा वैनगंगा नदी रेती घाटातून रात्रीच्या सुमारास अवैध रेतीचा खेळ सुरू झाला आहे.विशेष म्हणजे,रेती तस्कर बाहेर गावातील असल्याची खात्रीशीर माहिती आहे.सध्या रेतीला सोन्याचे भाव असल्याने रेती तस्करांसाठी मध्यरात्रीचा काळ हा शुभ मानला जातो आहे.यापूर्वी काही रेती तस्कर ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने चक्क कुरखेडा उपविभागीय पोलिस अधिकारी (एसडीपीओ)यांनी शनिवार १९ जुलै २०२५ च्या मध्यरात्री अवैध रेती उत्खनन व वाहतूक प्रकरणी मोठी कारवाई केल्याने रेती तस्करांचे धाबे दणाणले होते.धडक कारवाईत एकूण ३६ लाख ७७ हजाराचा मुद्देमाल जप्त करून सहा आरोपींना अटक केली होती.अश्यातच परत पुन्हा अवैध रेतीचा खेळ सुरू झाल्याने याचे नवल वाटत आहे.
सध्या पावसाळा सुरू असल्याने राज्यातील लिलाव झालेले संपूर्ण रेती घाट काही कालावधीसाठी बंद स्थितीत आहेत.अश्यातही काही ठिकाणी बांधकामे सुरू असल्याने रेतीची मागणी वाढली आहे.देसाईगंज येथे एक ब्रास रेतीसाठी ७ हजार रुपये मोजावे लागत आहेत, तर गाव खेड्यात ४ हजार रुपये.सदरचे दर हे रेती तस्करांसाठी सुगीचे ठरले आहेत.त्यामुळे दुसऱ्यांचे नाव पुढे करून स्वतः च माल सुतावो,अशी भूमिका रेती तस्करांनी घेतली आहे.त्यातच काहीजण “चोरी तर चोरी वरून शिनाजोरी” करून दादागिरी करू पाहू लागल्याने अश्यांवर तात्काळ आळा घालणे गरजेचे झाले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना...

देसाईगंजच्या विहीरगाव(पोटगाव)येथील ‘त्या’ मातेने रुग्णवाहिकेतच दिला गोंडस मुलीला जन्म..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव(पोटगाव)येथील रहिवासी स्वाती चांगदेव नेवारे ह्या माहेरी बाळंतपणासाठी गेल्या असता  आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेद्वारे गोंदियाला रेफर करत असतांनाच काही अंतरावरील मार्गावर...

कुरुडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे शासन स्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यात येतील,अशी ग्वाही आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!