Thursday, May 28, 2026
Homeदेसाईगंजकायद्याच्या चौकटीत राहूनच सण,उत्सव साजरे करा.. - गडचिरोली अप्पर पोलिस अधिक्षक गोकुलदास...

कायद्याच्या चौकटीत राहूनच सण,उत्सव साजरे करा.. – गडचिरोली अप्पर पोलिस अधिक्षक गोकुलदास जी – देसाईगंज येथे शांतता व सुव्यवस्था बैठक संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा सण पोळा व  त्याचे पाठोपाठ महाराष्ट्राचा प्रमुख उत्सव गणेश चतुर्थी सह ईद मिलाद उन्नबी हे मोठे सण साजरे करण्यात येणार आहेत.संवैधानिक तरतुदी नुसार देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या धार्मिक परंपरेनुसार उत्सव साजरा करण्याचा अधिकार आहे. मात्र तो कायद्याच्या चौकटीत राहुनच साजरा करावा,असे आवाहन गडचिरोली पोलिस दलाचे अप्पर पोलिस अधिक्षक गोकुलदास जी.यांनी देसाईगंज पोलिस स्टेशनच्या वतीने आयोजित शांतता व सुव्यवस्था बैठकीच्या माध्यमातुन केले.
देसाईगंज पोलिस स्टेशनच्या वतीने काल,बुधवारी स्थानिक नगर परिषद सांस्कृतिक भवनात देसाईगंज तालुक्यातील सर्व गणेश मंडळ,पोलिस पाटिल व इतर समाज बांधवांची शांतता व सुव्यवस्था बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी गडचिरोली पोलिस दलाचे अप्पर पोलिस अधिक्षक गोकुलदास जी.,कुरखेडा उपविभागीय पोलिस अधिकारी रविन्द्र भोसले,देसाईगंज ठाण्याचे पोलिस निरिक्षक अजय जगताप,पोलीस उपनिरीक्षक मनिष गोडबोले,पोलीस उपनिरीक्षक दांडेकर,पोलीस उपनिरिक्षक उदयभान जांभुळकर यांचेसह देसाईगंज पोलिस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते.उपस्थित सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी, सदस्य पोलिस पाटिल व इतर नागरिकांना बैलपोळा, गणेशउत्सव व ईद मिलाद उन्नबी या उत्सवा संबंधी मार्गदर्शन करतांना अप्पर पोलीस अधिक्षक गोकुळदास जी.म्हणाले की,भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकांना त्यांच्या धार्मिक मान्यतेनुसार सण उत्सव साजरा करण्याचा संवैधानिक अधिकार दिला असला तरी देशातील काही असामाजिक तत्वांकडुन धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या कालावधित करण्याची शक्यता नाकारता येत नाही.देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांचा महत्वाचा सण पोळा त्या पाठोपाठ गणेश चतुर्थी व इद मिलाद उन्नबी हे सण येत असुन देसाईगंज तालुक्यात एकुण ६२ गणेश मंडळे, शहरात १८ गणेश मंडळे उत्सव साजरा करतात.त्या पाठोपाठ १५ गावांत एकगाव एक गणपती ही संकल्पना राबविली जाते.ही अतिशय गौरवाची बाब असुन घटस्थापनेपासुन ते विसर्जन पर्यंत सर्व गणेश मंडळांना जाहिराती फ्लेक्स लावणे, ध्वणिक्षेपणाचा आवाजाची मर्यादा,विद्युत कनेक्शन पुरवठा संबधी तसेच डिजे व परंपरागत वाद्य या सबंधाने इत्यंभूत माहिती पोलिस प्रशासनाच्या वतीने देण्यात येणार आहे.तसेच ईद मिलाद उन्नबी च्या रॅली संबंधाने मार्गक्रमणाची माहितीही प्रदान करण्यात येणार आहे.हिंदु व मुस्लिम अश्या समाजाचे सण एकाच वेळेत येत असल्याने सर्व धर्मिय बांधवांनी धार्मिक सौहार्द टिकवुन ठेवण्यासाठी कायदेशिररित्या दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार सण,उत्सव साजरा करावा,असेही आवाहन या प्रसंगी केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गृहप्रवेशाच्या पत्रिका देण्यासाठी निघालेल्या तरुणावर वाटेतच काळाने झडप घालून मृत्यूने गाठल्याची घटना आज,गुरुवार २८ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान धानोरा...

पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा शेतशिवारात आढळला मृतदेह.. – वाघाच्या अफवेने वनविभागासह पोलिस यंत्रणेची मोठी धावपळ..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-घरच्यांना दवाखान्यात जात असल्याचे सांगून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा चक्क शेतशिवारात मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.पण,मृतदेहावरील खुणा पाहून...

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!