Friday, September 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी; शासन निर्णय निघाला.. तब्बल १५...

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी; शासन निर्णय निघाला.. तब्बल १५ हजार ६३१ पोलिस शिपाई आणि कारागृह शिपाई भरतीला हिरवा कंदील..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या १२ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्यात तब्बल १५ हजार ६३१ पदांसाठी पोलिस भरती करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता.त्यानुसार शासनाच्या वतीने याची अधिकृत घोषणा करण्यात आली होती.अश्यातच आता आज,बुधवार २० ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून राज्यातील पोलिस शिपाई आणि कारागृह शिपाई भरती बाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.त्यानुसार पोलिस शिपाई-१२ हजार ३९९ पदे, पोलिस शिपाई चालक-२३४ पदे,बॅण्डस्मन-२५ पदे,
सशस्त्र पोलिस शिपाई-२ हजार ३९३ पदे आणि कारागृह शिपाई-५८० पदे,असे एकूण १५ हजार ६३१ पदांच्या भरतीला शासनाच्या वतीने हिरवा कंदील देण्यात आला आहे.राज्यातील पोलिस शिपाई आणि कारागृह शिपाई १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान रिक्त झालेली पदे शंभर टक्के भरण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.पोलिस भरती प्रकियेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता ४५० रुपये तर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३५० रुपये इतके परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!