- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :- ‘ना मै खाऊंगा ना खाणे दुंगा’ असे म्हणविणाऱ्यांचे बिद्र वाक्य कुठे गेलेत,कुणास ठाऊक.भ्रष्टाचाराने इतका कळस घातलाय की,त्याची सीमाच उरलेली नाही.अधिकारी,कर्मचारी ऐकण्याच्या मनःस्थितीतच नाही.कुणी कोणाला मोजतच नाही. खालपासून ते वरपर्यंत अनेकांचे साटेलोटे असल्याशिवाय हे शक्यच नाही.सर्वसामान्य नागरिकांची अनेक प्रश्ने शासन दरबारी प्रलंबित ठेवली जाऊन कुठून पैसा मिळतोय,याकडेच साऱ्यांचे लक्ष असल्याचे स्पष्ट चित्र आहे.अश्यातच आपली बाजू कशी धुतल्या तांदळासारखी आहे,हे दाखविण्यासाठी अजब-गजब फंडा सामाजिक वनीकरण विभागाच्या काही भ्रष्ट अधिकारी,कर्मचाऱ्यांनी खुलाश्या द्वारे दिल्याचे उघड झाले आहे.भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील डोंगरला येथील वनविभागाच्या रोपवाटिकेत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत लावण्यात आलेल्या तब्बल २६ हजार २८१ रोपांचे वन्य प्राण्यांनी नुकसान केल्याचा दावा करण्यात आला आहे.विशेष म्हणजे,या रोपांसाठी ७ लाख ३० हजारांचा निधी खर्च करण्यात आला.नवलाची बाब म्हणजे,एवढ्या मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी रोपांचे नुकसान कसे करू शकतात,त्यामुळे सदरचे प्रकरण वनमंत्र्यांच्या दालनात गेले आहे.तक्रारीनंतर झालेल्या प्राथमिक चौकशीत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत रोपे लावल्याचा दावा असला,तरी प्रत्यक्ष चौकशी अहवालात मग्रारोहयो किंवा अभिसरण योजनेची नोंद नसल्याचे समोर आले आहे.या नोंदीतील विसंगतीमुळेच प्रकरण अधिक संशयास्पद ठरले आहे.याप्रकरणी वनपरिक्षेत्राधिकारी, वनरक्षक तसेच अधिसंख्य वन मजुराचे बयान घेण्यात आली आहेत. सहाय्यक वनसंरक्षक प्रवीण नाईक, सामाजिक वनीकरण विभागीय वन अधिकारी लक्ष्मण आवारे आणि तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय यांच्या चौकशीची मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.डोंगरला रोपवाटिकेत एकूण ५० हजार रोपे तयार करण्यात आली होती.त्यापैकी २६ हजार रोपे वन्य प्राण्यांनी नष्ट केली, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.रोपे वन्यप्राण्यांनी नष्ट केली.परंतु,ज्या प्लास्टिक पिशवीत ही रोपे लावण्यात आली होती.त्या पिशव्या गेल्या कुठे?असा प्रश्न येथे उपस्थित होतो.महत्वाचे म्हणजे,५० हजार रोपांपैकी वन्यप्राण्यांनी २६ हजार २८१ रोपे नष्ट केली,हा दावा खोटा तितकाच संशयास्पद आहे.असे असले तरीही ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेतली जात असल्याने सुशिक्षित लोकांना अशिक्षित करण्याचा प्रकार दिसून येतो.
- Advertisement -

